सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठवाडा, हिंगोली हादरली; भल्यापहाटे भूकंपाचा झाला थरथराट

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील अनेक गावांना भूकंपाचे हादरे बसले आहे.

Shruti Patil
  • Jul 10 2024 11:22AM

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना आज बुधवारी पहाटे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ इतकी नोंदवली गेली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्रस्थान असावे, असे सांगण्यात आलं आहे. भूकंपामुळे काही घरांना तडे देखील गेल्याचं वृत्त आहे. दरम्यान, या भूकंपाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील अनेक गावांना भूकंपाचे हादरे बसले. माळधामणी गावात भूकंपाच्या घटनेनंतर अचानक जमिन हादरल्याने नागरिक घराच्याबाहेर पळाले आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्याने पायी चालत जाताना दिसून येत आहे.

तर काहीजण घराच्या पायऱ्यांवर बसून गप्पा मारत आहेत. त्याचवेळी अचानक जमिनीतून गुढ आवाज होऊन भूकंपाचा धक्का बसतो. घरातील भांड्यांची तसेच इतर वस्तूंची पडझड होण्याचा आवाज येतो. जमीन हादरत असल्याचं लक्षात येताच नागरिक चांगलेच धास्तावतात. सर्वजण आरडाओरड करत मोकळ्या जागेत पळत सुटतात.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार