सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदूंचा अपमान करणाऱ्या अल्ला हू अकबर नाऱ्यावर बंदी घाला; वाशिममध्ये श्री. सुरेश चव्हाणकेंचे धडाकेबाज भाषण

घुसखोर मुक्त महाराष्ट्र करणे व मतदान रूपी अस्त्र वापरून देशहितासाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी, राष्ट्राला बळकट करण्यासाठी १०० टक्के मतदान जनजागृती हा या शिव प्रेरणा यात्रेचा मुख्य उद्देश आहे.

Sudarshan MH
  • Nov 15 2024 7:06PM

कारंजा: शिव प्रेरणा यात्रेनिमित्त आज दि. १५ नोव्हेंबर रोजी धर्मयोद्धा डॉ. श्री सुरेश चव्हाणके यांची कारंजा येथे सकल हिंदू समाजातर्फे जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली होती. घुसखोर मुक्त महाराष्ट्र करणे व मतदान रूपी अस्त्र वापरून देशहितासाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी, राष्ट्राला बळकट करण्यासाठी १०० टक्के मतदान जनजागृती हा या शिव प्रेरणा यात्रेचा मुख्य उद्देश आहे. भारतात अनुमाने १० कोटीहून अधिक रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर आहेत. महाराष्ट्रात त्यातील १ कोटी घुसखोर आहेत. मुंबईमध्ये यांतील ४० लाख घुसखोर आहेत. हे सर्व घुसखोर देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी आहेत. या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रात ‘जनता एन्.आर्.सी.’ (जनता राष्ट्रीय नागरिक नोंदणी) अभियान राबवले जाणार आहे.

 
यावेळी बोलतांना श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले, की भारतातील वाढत चाललेला मुस्लिम अन् घटत चाललेला हिंदू ही सर्वात मोठी समस्या आहे. आता हिंदूंनी रडायचं नाही तर लढायचं. हिंदू समाज सबळ बनला पाहिजे. जर राष्ट्र बळकट करण्यासाठी काही करायचं असेल, तर १०० टक्के मतदान करा. महाराष्ट्रात मुस्लिम उपमुख्यमंत्री होवू देणार नाही, त्यासाठी गावा - गावात जाऊन प्रचार करेल. उन्हात फिरून चेहरा काळा पडला तरी चालेल, पण महाराष्ट्राला हिरवं होवू देणार नाही.
 
देशहितासाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी १०० टक्के मतदान करा. जाती - जातीत, भाषा, प्रांत यांत विभागले जाऊ नका. हिंदू म्हणून एक या. मी कोणत्याही पक्षाला मतदान करा असे सांगत नाही, फक्त हिंदू म्हणून मतदान करा. निवडणुकीसाठी मत मागायला आलेल्या उमेदवाराला धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद, भूमी जिहाद, गो - हत्या बंदी यावर विधानसभेत हिंदूंचे प्रश्न मांडण्यास सांगा. व्होट जिहादचे उत्तर मतांचे धर्मयुद्ध करून द्या. 
 
सजग नागरिकांना आवाहन आहे, की त्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात घुसखोर आहेत का? हे पाहावे. शहरातील वार्ड आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क करून आपल्या भागात घुसखोर आहेत का? याचा शोध घेतला घ्यावा. या अभियानासाठी आतापर्यंत असंख्य ग्रामपंचायती आणि गावांना भेटी दिल्या आहे. यामध्ये धार्मिक, सामाजिक/ आदी विविध क्षेत्रांतील लोक कार्यरत आहेत. हे आंदोलन राजकीय नव्हे, तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने पाहावे. तसेच व्होट जिहाद संदर्भात उपस्थित हिंदूंच्या सोबत शपथ घेण्यात आली.
 

जनता NRC ची मोहीम कशी राबवली जाणार?

प्रथम क्षेत्र निश्चित केले जाणार. त्यानंतर कार्यकर्त्यांचा संघ आणि वर्गवारी केली जाणार. त्यानंतर घुसखोरांनी स्वत: पुढे यावे, यासाठी आवाहन केले जाणार. त्यानंतर शोधमोहीम राबवली जाईल. शोध लागलेली व्यक्ती घुसखोरच आहे ना? याची खात्री केली जाईल आणि त्यानंतर त्यांना देशाबाहेर घालण्यासाठी सरकारवर दबाव आणला जाईल. अशी ६ टप्प्यांमध्ये मोहीम राबवली जाईल.
 
तीन - चरण ब्लूप्रिंट...
 
पहिला टप्पा - जनजागृती...
 
या मोहिमेबाबत लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी संवाद साधणे, कार्यशाळा आयोजित करणे आणि स्थानिक समुदायांपर्यंत माहिती पोहोचवणे महत्त्वाचे आहे.
 
दुसरा टप्पा - कार्यकर्त्यांची टीम तयार करणे...
 
सक्षम कार्यकर्त्यांची एक मजबूत टीम तयार करावी लागेल, जी जनजागृतीसाठी मदत करेल आणि या समस्येवर काम करणाऱ्या संस्थांना सहकार्य करेल.
 
तिसरी पायरी - सरकारवर दबाव आणणे...
 
शोध आणि शोध घेण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून अहवाल प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. हे समस्येचे योग्य निराकरण करण्यात मदत करेल.
 
‘www.JananNRC.org’ या संकेतस्थळावर या अभियानाची माहिती देण्यात आली आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी आणि पाठींबा देण्यासाठी ९२०९४२०४२०४ या क्रमांकावर संपर्क करा. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार