मुंबई: सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्रचे प्रमुख या नात्याने, श्री. सुरेश चव्हाणके यांनी राज्यातील वाढत्या बांगलादेशी - रोहिंग्यांच्या घुसखोरीशी संबंधित गंभीर समस्या महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिली. सध्या राज्यात सुमारे ८० लाख ते १ कोटी घुसखोर बेकायदेशीरपणे वास्तव्य करत आहेत. जे केवळ स्थानिक जनजीवनावरच परिणाम करत नाहीत तर राज्याच्या लोकशाही प्रक्रियेला गंभीरपणे बाधा आणत आहेत.
गंभीर समस्या...
बोगस मतदानाचा धोका...
घुसखोरांच्या सहभागामुळे बोगस मतदानाच्या घटना वाढत असून, त्यामुळे लोकशाही प्रक्रिया कमकुवत होत आहे.
सुरक्षेचा धोका...
घुसखोरांच्या मोठ्या संख्येमुळे राज्य आणि देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
लोकसंख्याशास्त्रीय प्रभाव...
या घुसखोरांमुळे स्थानिक लोकसंख्येचे संतुलन बिघडत असून सांस्कृतिक - सामाजिक समस्या निर्माण होत आहेत.
मागणी...
राज्यातील शांतता, सुरक्षा आणि निवडणूक पारदर्शकता राखण्यासाठी खालील पावले त्वरित उचलली जावीत...
सार्वजनिक चेतावणी...
१९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र पोलीस आणि निवडणूक आयोगामार्फत घुसखोरांना मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याचा जाहीर इशारा देण्यात यावा. घुसखोर मतदान केंद्रांवर आढळून आल्यास त्यांना तत्काळ अटक केली जाईल, हे या इशाऱ्यात स्पष्ट असावे.
शोध ऑपरेशन...
१९ नोव्हेंबरच्या संध्याकाळी संभाव्य घुसखोरांच्या भागात पोलिसांनी छापे टाकून तपास मोहीम राबवावी. अवैध रहिवाशांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
मतदान दिवसाची प्रक्रिया...
२० नोव्हेंबरला संवेदनशील विधानसभा भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जारी करावा. मतदान केंद्रांवर येणाऱ्या संशयित घुसखोरांना तत्काळ अटक करावी.
मीडिया आणि सोशल मीडिया प्रमोशन...
या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध करावी. यामुळे घुसखोरांमध्ये भीती निर्माण होईल आणि ते निवडणूक प्रक्रिया हायजॅक करण्याचा कट रचू शकणार नाहीत.
नागरिकांची भूमिका...
आम्ही महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन केले आहे, की त्यांनी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी सतर्क राहावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. महाराष्ट्रातील १००+ विधानसभा मतदारसंघांची माहिती, एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरून संकलित केलेली माहिती आणि डेटा, ज्यामध्ये अनेक ठिकाणी मतदान नोंदणीची माहिती समाविष्ट आहे.
घुसखोरांवर तातडीने कडक कारवाई न केल्यास महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेवर गंभीर परिणाम होईल. याप्रकरणी त्वरित कारवाई करून घुसखोरांवर कडक कारवाई करावी, अशी विनंती डॉ. श्री. सुरेश चव्हाणके यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना निवेदनाद्वारे केली.