सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जैन तीर्थांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार - मंत्री मंगल प्रभात लोढा

सदर घटना संपूर्ण जैन समाजाला त्रस्त करणारी असून, त्या विरोधात दोषींना शिक्षा व्हायलाच हवी तसेच जैन तीर्थांच्या सुरक्षेसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे मंत्री लोढा यांनी या बैठकीत सांगितले.

Shruti Patil
  • Jun 19 2024 11:06AM
मुंबई: ४ दिवसांपूर्वी गुजरातमधील पावागढ येथे काही समाजकंटकांनी जैन तिर्थंकरांच्या मूर्तींची विटंबना केली. त्या विरोधात जैन तीर्थांच्या सुरक्षेसाठी आयोजित केलेल्या बैठकीत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबई जैन संघाच्या सदस्यांसोबत सहभाग घेतला. सदर घटना संपूर्ण जैन समाजाला त्रस्त करणारी असून, त्या विरोधात दोषींना शिक्षा व्हायलाच हवी तसेच जैन तीर्थांच्या सुरक्षेसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे मंत्री लोढा यांनी या बैठकीत सांगितले. 
 
पावागढ तीर्थ येथे संप्रती महाराजांच्या काळातील मूर्तींची तोडफोड करून त्या कचऱ्यात फेकण्यात आल्या आहेत. या कृत्यामुळे संपूर्ण भारतातील जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून, याबाबत पोलीसात तक्रार दाखल केली गेली आहे. पोलीसांनी याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी, यासाठी सूरत कलेक्टर ऑफिस बाहेर जैन समाजातील हजारो नागरिकांचे शांतिप्रय पद्धतीने आंदोलन सुरु आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार