सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सातारा स्फोट प्रकरणात पोलिसांकडून २ जिहाद्यांना अटक; स्फोटाचे धागेदोरे सोलापूरपर्यंत

शोएब मणियार, अकिब पिंजारी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

Sudarshan MH
  • Oct 8 2024 9:54AM

सातारा: साताऱ्यातील माची पेठेत अदालत वाड्याजवळ असलेल्या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये २ ऑक्टोबर या दिवशी भर दुपारी भीषण स्फोट झाला होता. हा स्फोट झाल्यानंतर ३ कि.मी. परिसर अक्षरश: हादरून गेला होता. यामुळे स्फोटकामध्ये नेमके कोणते घटक होते ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या स्फोट प्रकरणाचे धागेदोरे सोलापूर जिल्ह्यातील बार्शीपर्यंत निघाले असून तेथील दोघांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात त्यांना उपस्थित केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

आतापर्यंत चौघांना अटक झाली असून या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार असून पोलिसांचे धाडसत्र चालू रहाणार आहे. शोएब मणियार, अकिब पिंजारी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी आरंभी सातार्‍यातील दोघांना अटक केली. दोघा संशयितांचे अन्वेषण चालू असतांना त्यांच्याकडून बार्शी येथील धागेदोरे समोर आले. सातारा शहर पोलिसांनी बार्शीत जाऊन दोघांना अटक केली. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली असता यातील एकाकडे फटाके विक्रीचा परवाना आहे. दुसरा मात्र चालक आहे. या दोघांनी मिळून सातार्‍यात स्फोटात मृत्यू झालेल्या मुजमीन याला फटाके बनवणारी शोभेची दारू दिल्याचे समोर येत आहे. या तिघांमध्ये अधिकोषाचे व्यवहारही झाले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार