सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाशिक शिक्षक मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला यश; आमदर किशार दराडे यांचा विजय

नाशिक शिक्षक मतदारसंघातून आमदर किशार दराडे यांचा विजय झाला आहे.

Shruti Patil
  • Jul 2 2024 10:14AM
नाशिक: नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाली होती. तब्बल 24 तासांपासून या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. अखेर शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाले आहेत. गेल्या 24 तासांपासून मतमोजणी सुरू होती. पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झालेली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर होते. तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत होतं. पण, अखेर किशोर दराडेंनी विजय मिळवला.  
 
नाशिक मतदारसंघात ही निवडणूक अनेक अर्थांनी गाजली होती. पैशांच्या वाटपाच्या आरोप - प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक गाजली होती. तसेच, स्वतः मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षानं देखील उमेदवार दिला होता. तसेच, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचं सर्वात मोठं आव्हान किशोर दराडेंसमोर होतं. आतापर्यंत किशोर दराडे आणि विवेक कोल्हे यांच्यात चुरस रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. पण अखेर शिवसेनेच्या शिंदे गटाचे किशोर दराडे यांनी बाजी मारली असून विजयी झाले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार