पुणे: इंदापूर तालुक्यातील कळाशी परसता उजनी धरण परिसरात एक बोट बेपत्ता झाली असून कुगावं ते कळाशी या जलमार्गावरी ही बोट वाहतूक चालू होती. या बोटीतून एकूण 7 प्रवासी प्रवास करत होते. गावातील जोडपे, त्यांची दोन लहान मुले, एक पोलीस उप निरीक्षक, कूगाव येथील एक तरुण आणि बोट चालक, असे 7 प्रवासी संध्याकाळच्या सुमारास प्रवास करत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने ही दुर्घटना झाली.
सायंकाळी सहाच्या दरम्यान सुटलेल्या वादळी वाऱ्याने बोट पलटली व सर्वच प्रवाशी पाण्यात बुडाले. यावेळी पोलीस उप निरीक्षकाने पाण्यात उडी टाकून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. ते पोहत-पोहोत काठावर आले. त्यामुळे, या घटनेची माहिती मिळाली. मात्र, अद्यापही बोटीतून प्रवास करणारे इतर 6 जण बेपत्ता आहेत. दरम्यान, आता शोधकार्यासाठी प्रशासन घटनास्थळावर दाखल झाले असून 2 तासानंतरही अद्याप बुडालेल्या एकाचाही शोध लागलेला नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बोटीची शोधमोहिम सुरू केली आहे. या बोटीतून 7 जण प्रवास करत होते. त्यापैकी, राहुल डोंगरे हे सुरक्षीत आहेत. मात्र, बोटीतील इतर प्रवाशांचा शोध सुरू आहे
या संपूर्ण घटनेच्या आढावा राज्याचे मुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला असून त्यांनी तात्काळ प्रशासनाच्या आकृती व्यवस्थापन व सर्व यंत्रणा सूचना देऊन तात्काळ हे पत्ता असलेल्या प्रवाशांचा लवकरात लवकर शोध घेण्याचा सूचना दिल्या असून घटनास्थळी इंदापूरचे माजी राज्य मंत्री आमदार दत्तात्रय भरणे हे स्वता घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाचे सर्व आपत्ती व्यवस्थापनाचे यंत्र त्या ठिकाणी सध्या असून या गायब झालेल्या प्रवासांचा आता सुरू होण्यास सध्या सुरू आहे.