जळगाव: जळगाव शहरातील कांचननगरचा राजा सरकार उज्ज्वल चौक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव मिरवणुकीत धर्म जागृतीचे फलक हातात घेतले होते, मात्र पोलिसांनी हे फलक बळजबरीने हिसकावून घेतले. कांचननगरचा राजा सरकार उज्ज्वल चौक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीत ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या करणारा मुसलमान आणि हिंदू भाई भाई होऊ शकत नाहीत’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘महर्षी वाल्मीकि ऋषी’ इत्यादी विषयांचे छोटे फलक हातात घेतले होते. कार्यकर्त्यांनी मिरवणूक थांबवून जोरदार आंदोलन केल्यावर पोलिसांनी सर्व फलक कार्यकर्त्यांना परत केले. त्यानंतर मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची ही एक प्रकारची दडपशाहीच होती, असं म्हणता येईल.
मिरवणूक मुख्य मार्गावर आल्यावर पोलिसांनी अतिरिक्त पोलीस फौजेच्या साहाय्याने ‘आम्ही अनुमती देतांना ‘अनुचित शब्द वापरू नये किंवा धार्मिक भावना दुखावतील, असे कोणतेही कृत्य करू नये’ असे लिखित स्वरूपात सांगितले होते’, असे कारण सांगून या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हातातील फलक बळजोरीने काढून घेतले. त्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते संतप्त झाले. कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘जोपर्यंत धर्मजागृतीचे फलक मिळत नाहीत, तोपर्यंत मिरवणूक पुढे नेणार नाही’, अशी भूमिका घेऊन अर्धा घंटा ठिय्या आंदोलन केले.
कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत घालत छत्रपती शिवाजी महाराज, वाल्मीकि ऋषी आदी फलक परत केले; परंतु ‘गोहत्या’ आणि ‘लव्ह जिहाद’ यांचे फलक परत केले नाहीत. अन्य गणेशोत्सव मंडळांना त्रास होऊ नये; म्हणून मिळालेले फलक घेऊन कांचननगरचा राजा सरकार उज्ज्वल चौक मित्र मंडळाची मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली.