सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

घुसखोरांच्या शोधासाठी साडेपाच लाख कार्यकर्ते मैदानात उतरणार - धर्मयोद्धा डॉ. सुरेश चव्हाणके

‘www.JananNRC.org’ या संकेतस्थळावर या अभियानाची माहिती देण्यात आली आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी आणि पाठींबा देण्यासाठी ९२०९४२०४२०४ या क्रमांकावर संपर्क करा, असे आवाहन श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले आहे

Sudarshan MH
  • Oct 3 2024 5:56PM
मुंबई (३ ऑक्टोबर): भारतात अनुमाने १० कोटीहून अधिक रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर आहेत. महाराष्ट्रात त्यातील १ कोटी घुसखोर आहेत. मुंबईमध्ये यांतील ४० लाख घुसखोर आहेत. हे सर्व घुसखोर देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी आहेत. या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रात ‘जनता एन्.आर्.सी.’ (जनता राष्ट्रीय नागरिक नोंदणी) अभियान राबवले जाणार आहेत. या अभियानाच्या अंतर्गत घुसखोरांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रातील साडेपाच लाख कार्यकर्ते मैदानात उतरणार आहेत, अशी माहिती सुदर्शन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. या अभियानाची माहिती देण्यासाठी ३ ऑक्टोबर या दिवशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. चव्हाणके यांनी ही माहिती दिली. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) राजेंद्र निंभोरकर, कर्नल (सेवानिवृत्त) नरेश गोयल हे उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेला लष्कर, नौदल, नागरी सेवा दल यांसह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून या अभियानाला पाठिंबा दर्शवला. या वेळी श्री. सुरेश चव्हाणके म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या गृह विभागाच्या एका अहवालानुसार बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांच्या विरोधात पोलीस ठाण्यांमध्ये १ सहस्रहून अधिक गुन्हे नोंद आहेत. आसाममध्ये रहाणारे ३ लाख घुसखोर बांगलादेश तेथील सरकारच्या कारवाईला घाबरून महाराष्ट्रात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व अनधिकृत घुसखोरांनी राज्य सोडून निघून जावे. प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय नागरिक नोंदणीची समिती सिद्ध आहे. विषयी प्रत्येक जिल्ह्यात र्काशाळा घेण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगाल्याचे असल्याचे सांगून बांगलादेशी घुसखोर महाराष्ट्रात रहात आहेत. त्यांची ओळख पटावी, यासाठी कोलकता येथून १०० नागरिक महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांच्या भाषेवरून घुसखोरांना ओळखून स्थानिक पोलिसांच्या कह्यात देणार आहेत.’’
 
*१८ सहस्र ४०० ग्रामपंचायतींना संपर्क !
नागरिकांना आवाहन करून आपल्या आजूबाजूच्या परिसरात घुसखोर आहेत का ? हे पाहिले जाईल. शहरातील वार्ड आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क करून आपल्या भागात घुसखोर आहेत का ? याचा शोध घेतला जाईल. या अभियानासाठी आम्ही आतापर्यंत १८ सहस्र ५०० ग्रामपंचायती आणि ४४ सहस्र गावांना भेट दिली आहे. यामध्ये धार्मिक, सामाजिक आदी विविध क्षेत्रांतील लोक कार्यरत आहेत. राजकीय नव्हे, तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने हा विषय पहायला हवा, असे श्री. सुरेश चव्हाणके यांनी म्हटले.
 
* अशी राबवली जाणार मोहीम !
प्रथम क्षेत्र निश्चित केले जाणार. त्यानंतर कार्यकर्त्यांचा संघ आणि वर्गवारी केली जाणार. त्यानंतर घुसखोरांनी स्वत: पुढे यावे, यासाठी आवाहन केले जाणार. त्यानंतर शोधमोहीम राबवली जाईल. शोध लागलेली व्यक्ती घुसखोरच आहे ना ? याची खात्री केली जाईल आणि त्यानंतर त्यांना देशाबाहेर घालण्यासाठी सरकारवर दबाव आणला जाईल. अशी ६ टप्प्यांमध्ये मोहीम राबवली जाईल, असे श्री. सुरेश चव्हाणके यांनी सांगितले.
 
बांगलादेशातील घुसखोरांचा राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग आहे ! - राजेंद्र निंभोलकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल
भारताची ४ सहस्र १९८ किलोमीटर सीमा बांगलादेशला जोडली आहे. भारतातून १९७ नद्या बांगलादेशमध्ये जातात. सीमाभागात असलेले जंगल यांमुळे बांगलादेशातून भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत आहे. बांगलादेशातून भारतात आलेले घुसखोर हे आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी आहेत. त्यांना त्याविषयीचे प्रशिक्षण दिले जाते.
 
भारतात आलेल्या घुसखोरांना सहजरित्या आधारकार्ड प्राप्त होत आहे. आधारकार्डच्या आधारे घुसखोरांना देशाचे नागरिकत्व मिळत आहे. याचा मोठा परिणाम स्थानिकांच्या रोजगारावर झाला आहे. यापूर्वी राजस्थान आणि महाराष्ट्र येथील सुतारकाम करणारे नागरिक असायचे. सध्या सुतारकाम करणारे बांगलादेशी झाले आहेत. पूर्वी कोळी समाज करत असलेला मासेमारीचा व्यवसाय पूर्णत: बांगलादेशींनी बळकावला आहे. असेच चालू राहिले, तर येत्या १५-२० वर्षांत घुसखोरांमुळे भारतात गृहयुद्धाची वेळ येईल. या अभियानामध्ये सर्वसामान्यांनी सहभागी व्हायला हवे. 
 
घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी जनतेने सरकारवर दबाव वाढवावा - रणजित सावरकर...
 
बांग्लादेशी, पाकिस्तानी आणि अन्य घुसखोरांमुळे देश आणि राज्याची सुरक्षा, अर्थव्यवस्था धोक्यात येण्याबरोबरच स्थानिकांच्या रोजगारावरही गदा येत असल्याने राज्य शासनाने या समस्येवर तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा वेळ निघून जाईल, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात जवळपास एक कोटी आणि त्यातील ४० लाखांहून अधिक रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोर मुंबईत असून देशात त्यांची संख्या जवळपास १० कोटीहून जास्त आहे. हे घुसखोर विभिन्न गुन्हे आणि देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असून त्याचा सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, रोजगारावरही परिणाम झाला आहे. अशा घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्यासाठी लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) राजेंद्र निंभोरकर, रणजित सावरकर, कर्नल (सेवानिवृत्त) नरेश गोयल सुदर्शन वाहिणीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्यासह माजी लष्कर, नौदल, हवाई दल, नागरी सेवा दलातील अधिकारी आणि समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मिळून एक मोहीम सुरू केली आहे. सिविल सोसायटी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने जनता एनआरसी मुव्हमेंट सुरू झाली असून याला पाठींबा देण्यासाठी 9209 204 204 या मोबाइल नंबरवर मिस्ड कॉल द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
स्थानिकांवर उपासमारीची वेळ...
 
आज गुरुवारी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रणजित सावरकर, राजेंद्र निंभोरकर आणि सुरेश चव्हाणके यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना सावरकर म्हणाले, “गेल्या ३०-३५ वर्षात सुतार, टीव्ही दुरुस्त करणारे, ओला-उबेर टॅक्सी चालक, आंबा, भाजी विक्रेते, मासे विक्रेते या स्थानिकांच्या व्यवसायावर घुसखोरांमुळे अतिक्रमण केले असून स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कदाचित, पुढे १५-२० वर्षांनी या घुसखोरांचे बहुमत होईल आणि त्यांचे सरकारही येईल, या धोक्याची जाणीव सावरकर यांनी करून दिली.
 
सरकारवर दबाव...
 
“शासकीय यंत्रणा ही घुसखोरी रोखण्यासाठी अकार्यक्षम असून जनतेचेही हे अपयश आहे,” असे सांगतानाच “जनतेने ठरवले तर सरकारवर दबाव आणून उपाययोजना करण्यास जनता भाग पाडू शकते,” असे सावरकर यांनी स्पष्ट केले.
 
बांग्लादेशातून घुसखोरी सोपी...
 
निंभोरकर म्हणाले की, देशाची सीमा ज्या चार देशांना लागून आहे त्यात सगळ्यात मोठी सीमा बांग्लादेशची ४,१९८ किमी असून १९७ नद्या जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे घुसखोरी करणे सोपे जाते. ही घुसखोरी रोखण्यासाठी सीमा संरक्षण, ‘लक्ष्मी दर्शन’ न घेता, करणे आवश्यक आहे,” असे निंभोरकर यांनी निदर्शनास आणून दिले.
 
हजारहून अधिक एफआयआर...
 
सुरेश चव्हाणके यांनी राज्य शासनाकडून राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) कायद्याची अंमलबजावणी करण्याची जोरदार मागणी केली. “राज्यातील गृह विभागाच्या एका अहवालानुसार बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोर विरोधात हजारहून अधिक एफआयआर (FIR) विविध पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. नुकतेच उल्हासनगर येथे गेली अनेक वर्ष वास्तव्य करत असलेल्या एका बांग्लादेशी महिलेला तिच्या कुटुंबासहित पकडण्यात आले. तिकडे आसाममध्ये राहणारे ३ लाख घुसखोर बांग्लादेशी तेथील सरकारच्या कडक कारवाईला घाबरून राज्याबाहेर पळून महाराष्ट्र राज्यात आले आहे, अशी आमची माहिती आहे. महाराष्ट्रातून अनधिकृत घुसखोरांनी निघून जावे, अशी आमची मागणी आहे,” असे चव्हाणके म्हणाले.  
 
जनता NRC ची टीम तयार...
 
चव्हाणके पुढे म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यात जनता NRC ची टीम तयार झाली असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना आवाहन करून आपल्या आजूबाजूच्या परिसरात घुसखोर आहेत का? हे पाहिले जाईल. शहरातील वार्ड आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत यांच्याशी संपर्क करून आपल्या भागात घुसखोर आहेत का, याचाही शोध घेतला जाईल.
 
या अभियानासाठी आतापर्यंत १८,५०० ग्रामपंचायती आणि ४४ हजार गावांना भेट दिली आहे. यामध्ये धार्मिक, सामाजिक आदी विविध क्षेत्रांतील लोक कार्यरत आहेत. राजकीय नव्हे, तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने हा विषय पहायला हवा. बांग्लादेशी घुसखोर हे पश्चिम बंगालचे म्हणून येथे राहतात. त्यांची खरी ओळख पटावी म्हणून कोलकत्ता येथून १०० नागरिक महाराष्ट्रात येणार असून त्यांच्या भाषेवरून ते या घुसखोरांना ओळखणार आहेत आणि स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत. हे आंदोलन संपूर्णपणे अराजकीय राहणार असून आम्ही कायदा तोडणार नाही तर गनिमी काव्याने हे आंदोलन करणार आहोत. ज्या आंदोलनामुळे घुसखोरी थांबेल व राज्य घुसखोर मुक्त होईल,” असेही चव्हाणके यांनी सांगितले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 9209 204 204 या नंबर वर मिस्ड कॉल द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. आंदोलनाची अधिक माहिती www.JanataNRC.org वर या संकेतस्थळांवरून घ्यावी, असेही चव्हाणके म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार