सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे: हवेली तालुक्यातील जमिनीच्या व्यवहारात गोळीबार, दोन जण जखमी

पुणे: हवेली तालुक्यातील जमिनीच्या व्यवहारावरून एका उद्योजकाने दोन जणांवर गोळीबार केला, जखमी रुग्णालयात दाखल

अक्षय दोमाले
  • Sep 14 2024 4:49PM

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात रिंगरोडच्या लागून असलेल्या जमिनीच्या व्यवहारातील पैशांवरून एका बड्या उद्योजकाने दोन जणांवर गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. जखमी व्यक्तीवर लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती अशी आहे की, 14 सप्टेंबर रोजी कोरेगाव मुळ (ता. हवेली) येथील इमानदारवस्ती येथे ही घटना घडली. ऊरुळी कांचन पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संशयीत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे आणि गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इमानदारवस्ती येथील एका बड्या उद्योजकाच्या घरात दोन तरुणांनी रिंगरोडच्या जमिनीमधील गुंतवणुकीसाठी पैसे मागितले. या मुद्द्यावर वाद झाल्यानंतर तो वाद गोळीबारात रूपांतरित झाला.

आरोपीने अनेकदा गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिल्याने त्याच्याकडे करोडोंची गुंतवणूक झाली आहे. या परताव्यामुळे त्याचे ग्रहमान बदलले असून गुंतवणूक केलेले करोडो रुपये अडकले आहेत, अशी चर्चा आहे. हवेलीतील प्रमुख उद्योजक, अधिकारी आणि राजकारणी यांच्याकडून मोठी रक्कम त्याच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार