सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ईदसाठीही ध्वनीक्षेपक वापरणे हानीकारक - मुंबई उच्च न्यायालय

‘ईदच्या मिरवणुकांमध्ये ध्वनीक्षेपक आणि अन्य ध्वनीयंत्रणा यांच्या वापराला अनुमती न देण्याचे आदेश महापालिका आणि पोलीस यांना द्यावेत’, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Sep 21 2024 8:01AM

मुंबई: गणेशोत्सवात ध्वनीक्षेपक, तसेच अन्य ध्वनीयंत्रणा यांचा वापर करणे हानीकारक असेल, तर ईद - ए - मिलाद - उन्-नबीच्या मिरवणुकांमध्येही तोच परिणाम होतो, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ईदच्या काळात डीजे, नाचणे आणि ‘लेझर’ दिव्यांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या जनहित याचिकेवर सुनावणी करतांना मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपिठाने वरील टिपणी केली अन् याचिका निकाली काढली.

 
‘ईदच्या मिरवणुकांमध्ये ध्वनीक्षेपक आणि अन्य ध्वनीयंत्रणा यांच्या वापराला अनुमती न देण्याचे आदेश महापालिका आणि पोलीस यांना द्यावेत’, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ‘कुराण किंवा हदीस यांच्यात कोणत्याही उत्सवासाठी डीजे किंवा लेझर बीम वापरण्याची शिफारस नाही’, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार