सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

उमरखेड तालुक्याला समाजकंटकांनी धरले वेठीस; तालुक्यातील ढाणकी येथे मूर्तीची विटंबना तर विडूळ येथे मिरवणुकीवर दगडफेक

उमरखेड तालुक्यात दोन दिवसापासून काही समाजकंटकांनी धुडगूस घातला असून जनतेला तसेच पोलिसांना वेठीस धरण्याचे काम केले आहे.

Sudarshan MH
  • Sep 19 2024 9:39AM

यवतमाळ: उमरखेड तालुक्यात दोन दिवसापासून काही समाजकंटकांनी धुडगूस घातला असून जनतेला तसेच पोलिसांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढाणकी येथे मूर्तीची विटंबना केली असून गणपती विसर्जन दुसऱ्या दिवशी झाले तसेच विडुळ या गावी मिरवणुकीवर दगडफेक केली तर काल रात्री साडेदहा वाजता उमरखेड येथील बस स्टेशन जवळ असलेल्या संतोष पेन्शनवार यांच्या किराणा दुकानाला आग लावून दोन ते तीन लाख रुपयाचे नुकसान केले. जाळपोळ करणारा अज्ञात व्यक्ती सीसीटीव्ही मध्ये दिसत असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुकान पुर्ण जळण्यापासून वाचले आहे.

परंतु लागोपाठ दोन दिवस पोलिसांना तसेच तालुक्याला वेठीस धरणाऱ्या या समाजकंटकाच्या मुचक्या वेळीच आवळायला पाहिजे अशी भूमिका जनतेने मांडली आहे मागील चार दिवसापासून पोलिसांना दिवस रात्र झोप नसून यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, उप जिल्हापोलीस अधीक्षक पियुष जगताप, उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांचे संपूर्ण तालुक्यावर लक्ष आहे. पोलिसांनी काही आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार