सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे हादरले...! घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्या बहिणी गायब; रात्री दोघींचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळले ड्रममध्ये

राजगुरुनगरमध्ये बेपत्ता झालेल्या चिमुकलींचे मृतदेह ड्रममध्ये आढळले.

Sudarshan MH
  • Dec 26 2024 10:56AM

पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर शहरातून एक हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. घराबाहेर खेळत असलेल्या दोन मुली अचानक गायब झाल्या होत्या. मात्र त्यांचे मृतदेह बुधवारी रात्री उशिरा एका इमारतीच्या बाजूला दयनीय अवस्थेत आढळले आहे. या घटनेनं राजगुरूनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी या मुली घराजवळून बेपत्ता झाल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर येथे काल दुपारी दोन चिमुकल्या घराजवळ खेळतांना बेपत्ता झाल्या होत्या. पालकांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. पण त्यांचा काही शोध लागला नाही. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केल्यानंतर त्या दोघींचे मृतदेह राजगुरूनगर शहरातील एका इमारतीच्या ड्रममध्ये दयनीय अवस्थेत सापडले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून बेपत्ता झालेल्या या दोन मुलींसोबत काय झाले? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं राजगुरूनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार