पुणे: सतीश वाघ खून प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या खुनाची सुपारी दिली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. सतीश वाघ यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सापडला सतीश वाघ यांचा मृतदेह होता.
या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाइंड असल्याहे समोर आले आहे. भाजपाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर सतीश वाघ यांचे मामा होते.
या प्रकरणी पोलीस स्टेशन हडपसर गु. र. नं 1848/ 2024 भा. न्या. कलम 103(1), 140(1) ,140(2), 140(3), 61(2), 238, 3(5) गुन्ह्यामध्ये महिला आरोपी मोहिनी सतीश वाघ, वय 48, रा. ब्लूबेरी हॉटेल जवळ, फुरसुंगी फाटा, फुरसुंगी, पुणे यांचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे. या गुन्ह्यातील कटात त्यांचा सहभाग निश्चित झालं आहे. तसंच चौकशी दरम्यान महिला आरोपीनं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आज दि. 25/12/2024 रोजी साडे सात वाजता त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. यासंदर्भात अधिक माहिती वेळोवेळी कळविण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं.