सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वैजापूरमध्ये अवकाळीमुळे १९ हजार ‎हेक्टरवरील कांद्याचे पीक धोक्यात‎; ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर पडला करपा रोग

वाढत्या धुक्‍यामुळे कांद्याचे पीक जाण्याच्या मार्गावर आहे.‎

Sudarshan MH
  • Jan 1 2025 10:18AM
वैजापूर: गेल्या आठवड्यापासून असलेल्या ढगाळ‎ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाले‎ आहेत. ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर करप्या रोगाचा‎ प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी‎कांदा पूर्णपणे पांढरा पडला आहे. रोग आटोक्यात‎ आणण्यासाठी महागड्या औषधाची फवारणी‎करुन शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. वैजापूर ‎तालुक्यात १९ हजार हेक्टर कांदा पिकाची लागवड‎ करण्यात आली. ढगाळ हवामानामुळे कांदा व‎अन्य पिकांच्या वाढीवर मोठा परिणाम होत आहे.
 
ढगाळ वातावरणामुळे यावर्षीही पुन्हा शेतकऱ्यांवर संकट आले आहे. या हवामानामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात‎घट होणार असल्याने शेतकरी दुहेरी संकटात‎ सापडले आहेत. यावर्षी भरपूर पाणी असल्याने‎ शेतकरी कांदा पिकाकडे वळला आहे. कांदा‎मोठ्या प्रमाणात घेतला जात असताना या‎पिकावर ढगाळ हवामानाचा परिणाम होत आहे.‎
 
वाढत्या धुक्‍यामुळे कांद्याचे पीक जाण्याच्या मार्गावर आहे.‎ कांद्यावरील मर रोग, करपा व माव्यामुळे रासायनिक औषधे‎फवारणी करण्यासाठी एकरी दोन ते तीन हजार रुपये एका‎ फवारणीला खर्च येतो. त्यामुळे रासायनिक औषधांच्या‎ दुकानांमध्ये गर्दी होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार