सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बुधवारी दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोप; डॉ. मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती

जन्मशताब्दी वर्षाचा समारोपीय कार्यक्रम बुधवार, ७ ऑगस्ट रोजी सायं. ६ वा. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Aug 4 2024 10:51AM
नागपूर: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना काळातील अग्रणी कार्यकर्ते, जुन्या मद्रास प्रांतातील संघप्रचारक, कन्याकुमारी स्थित विवेकानंद शिला स्मारकाचे प्रेरणास्रोत श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गेल्या वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जन्मशताब्दी वर्षाचा समारोपीय कार्यक्रम बुधवार, ७ ऑगस्ट रोजी सायं. ६ वा. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती समितीचे सचिव, माजी खासदार अजय संचेती यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 
या कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यासोबतच देवनाथ पीठाचे जितेंद्रनाथ महाराज, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशरण शाही प्रामुख्याने उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनावर आधारित 'आधारवड' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थेला 'श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर शिक्षण सन्मान पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार