सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आदित्य - L1 नं हॅलो ऑर्बिटची पहिली कक्षा केली पूर्ण; इस्रोला अंतराळ मोहिमेत मोठं यश

इस्रोला अंतराळ संशोधनात मोठं यश मिळालं असून आदित्य एल १ अंतराळयानाने पहिली कक्षा पूर्ण केली आहे.

Shruti Turkane
  • Jul 3 2024 11:30AM

नवी दिल्ली: इस्रोच्या वैज्ञानिकांना मोठं यश मिळालं आहे. इस्रोच्या वतीनं आदित्य एल 1 हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मिशन लाँच करण्यात आलं होतं. या मोहिमेला मोठं यश मिळाल्यानं इस्रोच्या शास्त्रज्ञांचं मोठं यश मानलं जात आहे. इस्रोला मिळालेल्या या यशानं अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे.

आदित्य एल 1 या मोहिमेत आदित्य एल 1 नं मंगळवारी आपल्या मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण केला. पहिल्या सौर मोहिमेतील आदित्य-एल-1 अंतराळयानानं मंगळवारी सूर्य आणि पृथ्वी एल-1 बिंदूभोवती आपली पहिली कक्षा पूर्ण केली, असं भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) नं एका निवेदनात स्पष्ट केलं आहे.

आदित्य एल 1 Aditya-L1 मिशनची Lagrange point L1 इथं स्थित भारतीय सौर वेधशाळा आहे. मागील वर्षी 2 सप्टेंबरला आदित्य एल 1 मोहीम लॉन्च करण्यात आली. त्यानंतर 6 जानेवारीला आदित्या एल 1 त्याच्या लक्ष्यित कक्षेत ठेवण्यात आलं. आदित्य-एल 1 अंतराळ यानाला प्रभामंडल कक्षेत L1 बिंदूभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 178 दिवस लागतात. इस्रोनं आपल्या निवेदनात स्पष्ट केलं की, हॅलो कक्षेत प्रवास करताना आदित्य एल 1 या अंतराळयानाला विविध अडथळ्यांचा सामना करावा लागेल, त्यानंतर आदित्य एल 1 हे त्याच्या कक्षेतून बाहेर पडेल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार