सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे: शिरूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक तयारी जोरात

शिरूर विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी तयारी जोरात सुरू असून, विद्यमान आमदार अशोक पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे माऊली कटके यांच्यात स्पर्धा पाहायला मिळणार आहे. कटके यांची लोकप्रियता वाढली असून, भाजपकडून प्रदीप कंद यांची उमेदवारी संभाव्य आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

अक्षय दोमाले
  • Oct 2 2024 12:18PM

संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांच्या बिगुलाचा आवाज लागल्यानंतर सर्व आमदार आणि इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

शिरूर विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार अशोक पवार आहेत. ही जागा राष्ट्रवादीच्या नावावर असल्याने, महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे माऊली कटके इच्छुक उमेदवार म्हणून समोर आले आहेत. कटके यांचा शिरूरमध्ये सामाजिक कार्यातून मोठा प्रभाव असून, त्यांची लोकप्रियता वाढली आहे.

आमदार अशोक पवार हे विद्यमान आमदार असल्याने, पक्षफुटीनंतर त्यांनी शरद पवार गटात स्थान टिकवले आहे, त्यामुळे मंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. तथापि, कारखान्यांच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये त्यांच्यावर नाराजी दिसत आहे.

यंदा भाजपकडून प्रदीप कंद यांची उमेदवारी संभाव्य आहे, तर महाविकास आघाडीच्या तर्फे विद्यमान आमदार अशोक पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे माऊली कटके यांची स्पर्धा पाहायला मिळेल. शिरूरमध्ये या निवडणुकीबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार