सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गडचिरोलीत मोठी माओवादी कारवाई; ५ माओवादी ठार

गडचिरोली - महाराष्ट्र आणि नारायणपूर - छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात पोलिसांनी माओवादी विरोधी अभियान राबवले.

Sudarshan MH
  • Oct 21 2024 6:56PM
गडचिरोली: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात माओवादी विध्वंसक कारवायांच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गडचिरोली - महाराष्ट्र आणि नारायणपूर - छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात पोलिसांनी माओवादी विरोधी अभियान राबवले.
 
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री. यतिश देशमुख आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-60 पथकाच्या 22 तुकड्या आणि सीआरपीएफच्या QAT पथकाच्या 2 तुकड्यांनी माओवाद्यांचा शोध घेतला. पोलिसांवर माओवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला, ज्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी 5 माओवाद्यांना कंठस्नान घातले.
 
सदर मोहीम अद्याप सुरू असून, मृत माओवाद्यांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. या कारवाईबाबत अधिक माहिती उद्या देणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले 
 
मुकेश कावळे (एटापल्ली, गडचिरोली)...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार