सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे हे सांगण्यासाठी राज ठाकरेंच्या प्रमाणपत्राची गरज नाही; संजय राऊतांचे टीकास्त्र

संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर मोदी - शहांचे समर्थन करण्याचा आरोप केला.

Sudarshan MH
  • Nov 5 2024 11:52AM

मुंबई: शिवसेना ही काही शिंदेंची किंवा उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी नाही. धनुष्यबाण आणि शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हे शरद पवारांचं अपत्य आहे, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फोडा- फोडीच्या राजकारणावर टीकास्त्र सोडलं. डोंबिवलीतील पहिल्या सभेत राज ठाकरे यांनी सर्वांवरच जोरदार हल्ला चढवला.

आज तुम्ही ( राज ठाकरे) त्यांचाच ( मोदी) प्रचार करत आहात. पंतप्रधान मोदी, अमित शाह, फडणवीस, आज तुम्ही यांनाच आपले नेते मानत आहात. त्यांनीच ही बाळासाहेब ठाकरेंची, महाराष्ट्राच्या जनतेची प्रॉपर्टी बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेंना दिली. त्याच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्रात करायला निघाला आहात, यासारखं दुसरं पाप नाही. आणि (त्यासाठी) बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत ‘ अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना खडे बोल सुनावले.

शिवसेना, शिवसैनिक, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची जी प्रॉपर्टी आहे ती एकनाथ शिंदेंच्या घशात घालणारे मोदी - शाह यांचीच तळी राज ठाकरे उचलत आहेत. त्यांचा हल्ला मोदी - शहांवर पाहिजे. त्यांनी गॅलरीत बघून बोलू नये, तर सभागृहात पाहून बोलावं. शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे हे सांगण्यासाठी राज ठाकरे यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ज्या मोदी शहांनी बेकायदेशीरपणे शिवसेना एकनाथ शिंदेंना दिली, त्याच भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात व्हावा यासाठी तुमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना कधीच माफ करणार नाहीत असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार