राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांचा रँडम सर्वे येत्या आठ दिवसात पूर्ण करून २५% अग्रीम पिक विमा मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
या मदतीसंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पिक विमा कंपनीला याबाबत सूचना दिल्याचे देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.