सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नाहीत मात्र हिंदूंचीच मंदिरे सरकारच्या ताब्यात का? - पू. रामगिरी महाराज

कालपासून संत आणि शेकडो विश्‍वस्त यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे तृतीय मंदिर न्यास परिषदेला प्रारंभ झाला.

Sudarshan MH
  • Dec 25 2024 8:41AM

शिर्डी: संतांच्या वंदनीय उपस्थितीत नगर-मनमाड मार्गावरील ‘श्री साई पालखी निवारा’ येथील सभागृहात २४ डिसेंबर या दिवशी तृतीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेला प्रारंभ झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांतील विविध मंदिरांचे ७५० हून अधिक विश्‍वस्त, पुजारी आणि प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. ‘हर हर महादेव’, ‘सनातन हिंदु धर्माचा विजय असो’ या जयघोषात मंदिर-न्यास परिषदेला प्रारंभ झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांमधील ज्योतिबा, पंढरपूरची विठुमाऊली, कोल्हापूरची श्री अंबाबाई, नाशिकचा काळाराम आदी देवतांचा आशीर्वाद घेऊन विविध देवस्थानांचे विश्‍वस्त आणि प्रतिनिधी या मंदिर - न्यास राज्य परिषदेत सहभागी झाले होते. 

प्रतिकूल परिस्थितीत संतांनी मंदिरांची संस्कृती टिकवून ठेवली. सद्य:स्थितीत हिंदू केवळ तीर्थक्षेत्री जातात; परंतु त्या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट होत असेल, तर दुर्लक्ष करतात. अध्यात्म आपल्या प्रत्येक श्‍वासात आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात यायला हवे. धर्माविषयी निष्क्रीय राहिलो, तर भविष्यात हिंदूंना जगणे कठीण होईल. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असूनही भारतातील एकही मशीद किंवा चर्च सरकारने कह्यात घेतलेले नाही. मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन नगर येथील ‘सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान’चे मठाधिपती पू. रामगिरी महाराज यांनी तृतीय महाराष्ट्र मंदिर-न्यास राज्यस्तरीय परिषदेत केले.

यावेळी पू. रामगिरी महाराज पुढे म्हणाले, की भक्तांनी मंदिरात अर्पण केलेला निधी धर्मकार्यासाठी व्यय होण्याऐवजी अन्यत्र व्यय होणे, हे हिंदूंचे दुर्दैव आहे. मंदिरातील अर्पणातून संस्कृत विद्यापीठ स्थापन करणे, मुलांवर आध्यात्मिक शिक्षण देणे यांसाठी उपयोगात आणायला हवा. विकासाकरता आम्ही वेगळा कर देत आहोत, मंदिरातील पैशांचा उपयोग विकासासाठी का? मंदिरांमधून चांगल्या प्रकारे धर्मप्रसार होऊ शकतो. तरुणांनी मंदिरात यावे, हनुमान चालिसापठण करावी, यासाठी आम्ही तरुणांना प्रोत्साहित करत आहोत. मनोरंजनाची साधने अनेक आहेत; परंतु चित्ताला समाधान केवळ मंदिरांमध्ये मिळते. जीवनात द्विधा मन:स्थिती होते, तेव्हा मंदिरात आल्यावर स्थैर्य प्राप्त होते; मात्र विधर्मी लोक मंदिरांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिरामध्ये कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते; परंतु भाविकांनी अर्पण केलेल्या या निधीचा धर्मकार्यासाठी काय उपयोग होतो ? तिरुपतीमधील बालाजी देवस्थान देव न मानणार्‍यांच्या ताब्यात जाणे, हे हिंदूंसाठी दुर्दैवी आहे. अनेक ठिकाणी मंदिरांवर आक्रमणे होत आहेत. जीवनात उद्वीग्नता येते, तेव्हा कुणीतरी जवळची व्यक्ती असावी लागते. मनातील भावना परमेश्‍वरापुढे व्यक्त केल्यावर मन हलके होते. यासाठीच मंदिरांची आवश्यकता आहे. मंदिर म्हणजे ‘मंगलता’ आणि ‘दिव्यता’ यांचे स्थान होय.

मंदिरातील भगवंताच्या मूर्तीमधून देवत्व प्रकट होत असते. त्यामुळे अंत:करणातील भाव जागृत होतो. सामाजिक कार्य करणार्‍यांना मंदिरे ही सामाजिक सेवेचे स्थान वाटत नाही. चित्रपटातील नटी पाहून वेगळे भाव जागृत होतात, मंदिरातील देवीची मूर्ती पाहून वेगळे भाव जागृत होतात. हे मंदिरांचे श्रेष्ठत्व आहे. अंत:करणाची स्थिरता आणि शुद्धता यांसाठी मंदिरांची आवश्यकता आहे. देवतेेचे चरित्र डोळ्यांपुढे असेल, तर त्याचा आदर्श आपण जीवनात आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मंदिरे ही एकप्रकारे समाजसेवेचीही केंद्रे आहेत.

२ दिवसीय मंदिर - न्यास परिषदेत हिंदु धर्मकार्यात मंदिरांचे योगदान, मंदिरांचे सुयोग्य व्यवस्थापन, मंदिरांतील अपप्रकारांना रोखणे, भाविकांना सुविधा, मंदिरांतील वस्त्रसंहिता आदी विविध विषयांवर मार्गदर्शन, उद्बोधन सत्रे, परिसंवाद यांद्वारे उपाययोजना आणि कार्याची पुढील दिशा ठरवण्यात आली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार