सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सेक्युलरचा अर्थ धर्मनिरपेक्ष नसून सर्वधर्मसमभाव... हिंदुत्वाचा खरा अर्थ राष्ट्रीयत्व - नितीन गडकरी

गडकरी म्हणाले, हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू जीवनपद्धती यांच्याबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत.

Sudarshan MH
  • Dec 28 2024 2:27PM
नागपूर: हिंदुत्वाचा खरा अर्थ राष्ट्रीयत्व, भारतीयत्वाशी आहे. हेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे हिंदुत्व होते, असे सांगतांना सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष नव्हे तर सर्वधर्मसमभाव आहे. या शब्दांत स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वपक्षियांसोबतच विरोधकांनाही खडे बोल सुनावले. भाजपातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भातील आमदार व मंत्रांचा सत्कार गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
 
गडकरी म्हणाले,आजच्या कार्यक्रमासाठी अटलजींच्या जन्मशताब्दीचा दिवस निवडला याचा आनंद आहे. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. भारतीय जनता पार्टीची १९८० मध्ये स्थापना झाली. न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये पक्षाच्या स्थापनेसाठी राम जेठमलानी व शांतीभूषण नागपूरला आले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत आपला दारूण पराभव झाला. ‘पर्याय पर्याय म्हणून ओरडतात कोण? ज्यांचे निवडून आले दोन!’ अशी आपली थट्टा झाली. पण अटलजी थांबले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादाचा मूलमंत्र आपल्याला दिला. ‘हम दो चार रहे न रहे… तेरा वैभव अमर रहे माँ’, हा मंत्र त्यांनी आपल्याला दिला. हा इतिहास भविष्याचा वेध घेण्याची प्रेरणा देतो. हिंदू, हिंदुत्व, हिंदू जीवन पद्धतींबद्दल गैरसमज आहेत. पण भारतीयत्व हेच हिंदूत्व आहे आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, हा विचार अटलजींनी दिला, या शब्दांत गडकरी यांनी भारतरत्न अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार