सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा..

रत्नागिरी - सिंधुदुर्ग दौऱ्यावर विरोधकांची सडकून टीका

Abhimanyu
  • May 22 2021 6:04PM


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल तौक्ते वादळात नुकसान झालेल्या  रत्नागिरी  आणि   सिंधदुर्ग जिल्हात  पाहणी करत आढावा बैठक घेतली. तौक्ते वादळाचा या जिल्ह्यांना फार मोठा फटका बसला असुन वादळामुळे नुकसान झालेल्या शेतीचे आणि फळबागाचे पंचनामे दोन दिवसात तातडीने करावे असे ठाकरे यांनी सांगितले आहे. ठाकरे यांच्या दौऱ्यापुर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी देखील पाहणी दौरा केला असुन फडणवीस यांनी  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी केली होती..
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी  ठाकरें यांच्यावर ट्विट करत टीका करत त्या म्हणाल्या की  मुख्यमंत्र्यांच्या  तीन तासांच्या कोकण  दौऱ्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या आणि किती जनतेच सात्वन केल, हे सगळे कृपा करुन विचारु नका अस म्हणत ठाकरें यांच्यावर टिका केली, या टिकेला प्रतीउत्तर देत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रधानमंत्री मोदीवर टीका करत '' मी हेलीकॉप्टर नाही तर जमिणीवरुन नुकसानाची पाहणी करतोय '' अस म्हणत मोदींवर निशाना साधला होता. ठाकरेंच्या या टिकेनंतर आरोप प्रत्यारोप
सुरुच असुन  ठाकरेंच्या या  टिके नंतर  सरकार आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्याचालु असुन या टीकेला प्रतीउत्तर देत  चंद्रकात पाटील यांनी  म्हटल की दीड वर्षानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घराबाहेर पडले असुन सत्तेत गेल्यापासुन ठाकरें हवेत होते मात्र त्यांचे पाय आता जमिनीवर आले आहेत यांचा आम्हाला आनंद आहे असे म्ह्रणत भाजपचे प्रदेश  अध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी ठाकरें यांच्यावर बोचरी टीका केलीये.
आता पाटलांच्या टीकेला ठाकरे सरकार काय प्रतिउत्तर देणार हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
:- अभिमन्यू फड

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार