सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दिल्लीत भाजपाने मारली मुसंडी; अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया 'आप'टले

दिल्लीत भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे. भाजपाने जल्लोष सुरू केला आहे. तर अरविंद केजरीवाल यांची बैठक सुरू आहे. दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.

Sudarshan MH
  • Feb 8 2025 1:02PM

दिल्ली: दिल्लीत भाजपाचे कमळ २७ वर्षानंतर फुलले आहे. सुरुवातीच्या कलामध्ये भाजपाने ४२ जागांवर मुसंडी मारली. तर आपला २८ ठिकाणी आघाडी आहे. काँग्रेसला भोपळा फोडता आला नाही. यापूर्वी सुषमा स्वराज या भाजपाच्या अखेरच्या मुख्यमंत्री होत्या. त्या केवळ ५२ दिवसच मुख्यमंत्री पदावर होत्या. आता भाजपाने दिल्लीत करिष्मा दाखवल्यानंतर दिल्लीचा नवीन मुख्यमंत्री कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचं सुक्ष्म नियोजन, केंद्रीय मंत्री आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री प्रचारात उतरले. दिल्लीत ज्या भाषिकांची जास्त लोकवस्ती त्या ठिकाणी त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभा घेऊन मतदारांना आकर्षित केलं. मुस्लिम बहुल इलाक्यात विश्वास निर्माण करण्यात भाजप यशस्वी, तर आपचं दलित मुस्लिम प्रेम फक्त कागदावरच राहिलं. प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहीच केलं नाही, यामळे आपला फटका बसल्याचे दिसून येत आहे.

इंडिया आघाडीतील फूट, शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांनी आपला पाठिंबा दिला. पण विधानसभा निवडणुकीत आपच्या प्रचाराला यातील कोणताही दिग्गज आला नाही. त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याचंच मतदारांसमोर गेलं. केजरीवाल यांच्या पाठीशी इंडिया आघाडीतील नेते आहेत हे दिसलंच नाही. तर काँग्रेससोबत केजरीवाल यांनी आघाडीन केल्याचा फटका सुद्धा आपला दिसून आले. भलेही काँग्रेसला निवडणुकीत भोपळा फोडता आला नाही. पण काँग्रेसची मतं आपला मिळाली असती, तर चित्र वेगळं दिसलं असतं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार