सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सांत आंद्रे मतदारसंघात फ्रांसिस सिल्वेराची किमया, सातही पंचायत समितीने दिली कामाची पावती ...

सर्व पंचायतीच्या सरपंच , उपसरपंच व पंचानी पाठिंबा दिल्यामुळे सांत आंद्रे मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सिल्वेरा यांचा विजय निश्‍चित झाला आहे.

Snehal Joshi .
  • Feb 1 2022 7:19PM

पणजी :   सांत आंद्रे  मतदार संघातील सातही पंचायतीचे सरपंच , उपसरपंच व पंच यांनी  भारतीय जनता पक्षाचे सांत आंद्रेचे उमेदवार फ्रांसिस सिल्वेरा यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. येथील सर्व पंचायतीच्या सरपंच , उपसरपंच व पंचानी पाठिंबा दिल्यामुळे सांत आंद्रे मतदारसंघात भाजपाचे उमेदवार  सिल्वेरा यांचा विजय निश्‍चित झाला आहे.

 आज पणजी येथील भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत   आगशी, कुडका , बांबोळी, नेवरा, गोवा वेल्हा, भाटी,  तळावली या सर्व  पंचायतीचे सरपंच , उपसरपंच व पंचानी  उपस्थित राहून
सिल्वेरा  यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला . व गेल्या पाच वर्षांमध्ये  विशेषता सिल्वेरा हे  काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाल्यानंतर  सांत आंद्रे मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याचे त्यांनी सांगितले.
आगशी पंचायतीचे सरपंच झेवियर ग्रेसीएस यांनी यावेळी बोलताना सांगितले की  सिल्वेरा यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सत्ताधारी भाजपच्या सरकारमुळे त्यांची अनेक कामे झाली. सांत आंद्रे मतदारसंघातील विविध गावांमध्ये रस्ते ,वीज , पाणी या समस्या त्यांनी सोडवल्यास.  रोजगारही दिला.  आगशी  गावामध्ये अनेक विकास कामे केली. येथील पाण्याची समस्या नष्ट करण्यासाठी जुवारी नदीतून पाईपलाईन टाकून साळावलीचे पाणी आगशीला अर्थात सांत आंद्रेमध्ये आणले . त्याचबरोबर अनेक विजेचे ट्रांसफार्मर बसवले .वीज वाहिन्या बदल्या . नाल्यांचे बांधकाम केले. रस्त्यांचे हॉट मिक्सिंग केले . सुमारे शंभर कोटीची विकास कामे  सिल्वेरा यांनी सांत आंद्रे मतदारसंघात केल्याची माहिती ग्रेसीयस  यांनी दिली. हर घर नल द्वारे नळाची जोडणी नव्हती त्यांना नळाची पाईपलाईन देतानाच दोन नव्या टाक्यांचे बांधकामही सिल्वेरा यांच्या प्रयत्नाने सुरु झाल्याचे ग्रेसीयस यांनी सांगितले. विरोधकांना सिल्वेरा यांनी केलेला विकास दिसत नाही. आणि त्यामुळेच ते त्यांच्यावर टीका करत आहेत. भाजप सरकारमध्ये मंत्रिपदी राहून भरपूर श्रीमंत झालेले मायकल लोबो आता काँग्रेसमध्ये गेलेत आणि ते सांत आंद्रे मध्ये येऊन सिल्वेरा यांनी विकास केला नाही असे सांगत आहेत . हेच लोबो काही महिन्यापूर्वी सांतआंद्रे  आले असता  सिल्वेरा सारखा कार्यतत्पर आमदार नाही . असे म्हणत होते. त्यामुळे अशा लोकांनी सिल्वेरा यांनी केलेला पहावा आणि नाहक टीका करू नये .असेही ग्रेसीयस म्हणाले .विरोधकांच्या दिशाभूल करण्याच्या घोषणा वर  सांत आंद्रेची   जनता अजिबात भूलणार नाही. उलट सिल्वेरा  यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून देईल .असेही  ग्रेसीयस  यांनी सांगितले .

 सिल्वेरा यांनी अनेक विकास कामे  केल्याचे  कुडका बांबोळी चे माजी सरपंच व विद्यमान पंच गौतम नाईक यांनी सांगितले. पंचायतीमध्ये विकास कामे करतानाच बेरोजगारांना रोजगार  दिला. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर विकास कामांना गती आली. पंचायत  इमारतीची पायाभरणी त्यांनी केली असून पुन्हा ते निवडून येतील आणि  आमचे पंचायत घर पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोना काळात आवश्यक त्या सर्व सुविधा  सिल्वेरा यांनी लोकांसाठी उपलब्ध केल्या. स्वतः घराघरांमध्ये फिरून आवश्यक वस्तू त्यांनी दिल्या. आरोग्य सुविधाही उपलब्ध केल्या. त्यामुळे त्यांनी विकास केला नाही या आरोपात तथ्य नाही.  येत्या निवडणुकीत सांत आंद्रेतील इतर उमेदवार सिल्वरिपेक्षा बरेच मागे राहतील आणि भाजपचा झेंडा पुन्हा एकदा सांत आंद्रेत फडकेल. असे यावेळी फ्रान्सेस्को डिसोजा  म्हणाले. 

या पत्रकार परिषदेला आगशी पंचायतीचे सरपंच झेवीयर  ग्रेसिअस कुडका बाबळीच्या सरपंचा वेरोनिया डिसोजा ,नेवरा पंचायतीच्या सरपंच उषा नाईक,  वेल्हा च्या सरपंच विवीना,  भाटी पंचायतीचे सरपंच फ्रान्सिस्को डिसोजा ,डोंगरी चे फ्रान्सीस्को पो तसेच  , उपसरपंच,पंच सदस्य उपस्थित होते .

दरम्यान सांत आंद्रे येथील सातही पंचायतीच्या  आजी माजी सरपंच, उपसरपंच आणि पंच यांनी भाजपाचे उमेदवार फ्रान्सिस सिल्वेरा यांना पाठिंबा दिल्यामुळे सांत आंद्रेमध्ये या वेळी नक्कीच कमळ फुलणार आहे.  हे स्पष्ट झाले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार