Maharashtra New Expressway: महाराष्ट्र राज्याला आणखी एका नवीन महामार्गाची भेट मिळणार अशी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याला ६०,००० कोटी रुपयांच्या एका नवीन महामार्गाची भेट मिळणार अशी मोठी घोषणा केली आहे.
गडकरी यांनी म्हटल्याप्रमाणे, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला लाभ व्हावा यासाठी एक नवीन महामार्ग विकसित होणार आहे. पुणे ते बंगळूरू नव्हे तर आता आम्ही मुंबई - पुणे - बंगळूरू असा नवीन द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येणार असल्याची माहिती हाती आली आहे. अशा परिस्थितीत, आज आपण या नव्या महामार्गाबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या महामार्गाचा रूट मॅप नेमका कसा राहणार? याबाबतही थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.