सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

पश्चिम बंगालमधील हिंदू असुरक्षितच! मुर्शिदाबादमधून मुस्लिम बहुल भागातून हिंसाचारामुळे शेकडो हिंदूंचे पलायन; आतापर्यंत ३ हिंदूंची हत्या

शुभेंदू अधिकारी यांनी दावा केला आहे की "मुर्शिदाबादमधील धुलियान येथील ४०० हिंदूंना पलायन करावं लागलं आहे."

Sudarshan MH
  • Apr 14 2025 9:53AM

West Bengal Riots over Waqf Amendment Act Murshidabad Burning: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे जिहादी मुस्लिमांनी वक्फ सुधारणा कायद्यावरून गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार चालू केला आहे. यात आतापर्यंत ३ हिंदूंना ठार करण्यात आले, ते अनेक हिंदूंची घरे, दुकाने लुटण्यात आली आणि त्यांची जाळपोळ करण्यात आली. यामुळे घाबरलेल्या ४०० हून अधिक हिंदूंनी तेथून पलायन केले आहे, तर अनेकांनी दुसर्‍या गावातील शाळांमध्ये आश्रय घेतला आहे.

वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये चालू असलेल्या असलेल्या आंदोलनात गेल्या तीन - चार दिवसांपासून जाळपोळीचे प्रकार घडू लागले आहेत. राज्यातील मालदा, मुर्शिदाबाद, दक्षिण २४ परगणा आणि हुगळी जिल्ह्यात हिंसाचाराचे लोण पसरले आहे. अनेक ठिकाणी दंगली होत आहेत. या दंगली रोखण्यासाठी व सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी कोलकाता उच्च न्यायालयाने दंगलग्रस्त भागात केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपचे आमदार आणि राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी आरोप केला, की धर्मांधांच्या भीतीमुळे मुर्शिदाबाद जिल्ह्यातील धुलियन क्षेत्रामधून ४०० हून अधिक हिंदूंना त्यांची घरे सोडून पलायन करण्यास भाग पाडण्यात आले आहे. या हिंदूंनी नदी पार करून मालदा जिल्ह्यातील बैष्णवनगर येथील देओनापूर - सोवापूर ग्रामपंचायत क्षेत्रामधील लालपूर हायस्कूलमध्ये आश्रय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसच्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळे कट्टरतावादी शक्तींना प्रोत्साहन मिळाले आहे. यामुळे हिंदूंना आता त्यांच्याच भूमीत असुरक्षित वाटत आहे. हे कायदा आणि सुव्यवस्थेचे पूर्णपणे अपयश आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार