कोल्हापूर: विशाळगड तात्काळ अतिक्रमणमुक्त करण्यात यावा, या मागणीसाठी सहस्रो शिवप्रेमींनी विशाळगडाच्या पायथ्याशी श्री वाघजाईदेवीची महाआरती केली. भर पावसात सहस्रो शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात विशाळगडावर जमले होते. या प्रसंगी ‘मुक्त करा-मुक्त करा विशाळगड मुक्त करा’, ‘आई भवानी शक्ती दे-विशाळगडाला मुक्ती दे’, अशा घोषणा या प्रसंगी शिवप्रेमींनी दिल्या.
सकल हिंदू समाज, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.