सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाकुंभमेळ्यासाठी हुबळी ते वाराणसी ६ विशेष रेल्वे धावणार पुणे, सातारा, सांगलीवरून

महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे जाण्यासाठी हुबळी ते वाराणसी अशा ६ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Sudarshan MH
  • Feb 13 2025 10:28AM
MahaKumbh 2025 Special Train: प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु आहे. रोज कोट्यवधी भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी जातात. दरम्यान, महाकुंभमेळ्यासाठी जाण्यासाठी विशेष हुबळी ते वाराणसी अशा सहा रेल्वे फेऱ्या होणार आहेत. ही रेल्वे पुण्यासह सातारा, दौंड, मिरज, सांगली,अहिल्यानगर येथून धावणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना प्रयागराजला जाण्यासाठी विशेष गाडी उपलब्ध झाली आहे.
 
कुंभमेळ्याला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हुबळी - वाराणसी विशेष रेल्वे धावणार आहे. त्यामध्ये रेल्वे क्रमांक ०७३८३ ही विशेष रेल्वे गाडी १४, २१ आणि २८ रोजी हुबळी येथून सकाळी आठ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता वाराणसी येथे पोहचेल. रेल्वे क्रमांक ०७३८४ ही विशेष गाडी १७ आणि २४ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी वाराणसी येथून सकाळी पाच वाजता सुटेल व हुबळी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी पोहचेल.
 
या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, १ सामान्य द्वितीय सिटिंग असलेली गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार असेल. ही ट्रेन मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड आणि भुसावळ मार्गे धावणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार