सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘कोर्टाने काय करावं हे पक्ष ठरवणार का?’; माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे संजय राऊतांना सडेतोड उत्तर

कोणत्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने काय निर्णय घ्यावा, हे आता एखादा पक्ष ठरवणार आहे का, मला माफ करा, पण हे सर्व अधिकार मुख्य सरन्यायाधीशांकडे असतात'. असा शब्दात डीवाय चंद्रचूड यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Sudarshan MH
  • Nov 27 2024 9:58AM

मुंबई: महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर खासदार संजय राऊत यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर राज्यातील आमदारांच्या अपात्रते संदर्भातील याचिका लटकवल्याचा आरोप केला होता. यावर आता माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

 
'एएनआय' या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या कार्यकाळात सुनवण्यात आलेले अशा महत्त्वाच्या याचिकांची यादी सांगितली, ज्याची वाट संपूर्ण देश पाहत होता. आपल्या कार्यकाळात ९ सदस्यीय खंडपीठ आणि सात सदस्यीय खंडपीठाने महत्त्वाच्या घटनात्मक विषयांवर निर्णय दिले. यावर पुढे बोलताना चंद्रचूड म्हणाले, की एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती ठरवणार का सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी? मला माफ करा, पण हा अधिकार सरन्यायाधीशांकडे असतो.
 
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या पराभवानंतर खासदार संजय राऊत यांनी पराभवाचे खापर माजी सरन्यायाधीशांच्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. न्यायाधीश चंद्रचूड यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय न घेतल्याने कायद्याची भीती संपली आणि पक्ष बदलणाऱ्यांचा फायदा झाला. जर त्यांनी योग्य वेळी निर्णय दिला असता, तर या निवडणुकीचा निर्णय वेगळा लागला असता.
 
संजय राऊत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य देखील केले, की इतिहास तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तुमचे नाव काळ्या शाईने लिहले जाईल. आतासुद्धा कोणीही कुणालाही विकत घेऊ शकतं. कारण दहाव्या शेड्यूलची भीतीच राहिलेली नाही आणि न्यायमूर्तींची नाही', अशीही टीका राऊत यांनी केली होती २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांच्या अपत्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावर शिंदे गटाने देखील याचिका दाखल केली होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार