मुंबई: विरार ते नालासोपारा या दरम्यान रेल्वे रुळामध्ये बिघाड झाल्याने मोटारमनने प्रसंगावधान राखत वातानुकूलित लोकल थांबविण्यात आली. मंगळवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे दीड - दोन तास लोकल थांबून होती. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला तर काही प्रवाशांनी पायी प्रवास करीत स्थानक गाठले.
विरार आणि नालासोपारा दरम्यान रेल्वे रूळ वाकला होता की वाकवला होता? अशी घातपाताची शंका त्यावेळी प्रवाशांच्या मनात उपस्थित झाली. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. परंतु, नागरिक आणि मोटारमन यांच्या लक्षात येताच तातडीने वातानुकूलित लोकल थांबविण्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.