सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईतून मेघालयात पळून गेलेल्या बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या दोन जिहाद्यांना अटक

नवी मुंबईतून मेघालयात पळून गेलेल्या बांगलादेशी नागरिकांना मदत केल्याप्रकरणी दोन जिहाद्यांना अटक करून मेघालय पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Sudarshan MH
  • Apr 16 2025 11:51AM
मुंबई: नवी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या दोन जिहाद्यांना अटक करून त्यांना मेघालय पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यामध्ये एका पुरुषासह एका महिलेचा समावेश आहे. मेघालय पोलिसांनी या दोघांविरुद्ध ट्रान्झिट वॉरंट घेतल्यावर ही कारवाई करण्यात आली. सध्या नवी मुंबई पोलीस विभागात बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठ्या प्रमाणात तपास आणि अटकेची मोहिम राबवली जात आहे.
 
या पार्श्वभूमीवर, मेघालय राज्यातील पोलिसांनी देखील मोठी कारवाई करत तेथील २० बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तपासा दरम्यान या बांगलादेशी नागरिकांना नवी मुंबईतील जिहादी जबीर युनूस शेख आणि नुसरत हर्षद काझी यांनी विविध स्वरूपात मदत केल्याचे उघड झाले. या मदतीमध्ये त्यांना ओळखपत्र मिळवून देणे, बँक खाती उघडून देणे आणि आर्थिक व्यवहारात मदत करणे यांचा समावेश होता.
 
मेघालय पोलिसांनी ही माहिती नवी मुंबई पोलिसांना दिल्यानंतर संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली आहे. जिहादी जबीर शेख व नुसरत काझी यांना नवी मुंबईतून ताब्यात घेण्यात आले आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर मेघालय पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाकडून ट्रान्झिट वॉरंट घेऊन त्यांना मेघालय येथे पुढील चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार