सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे व पालघर जिल्ह्यातील६० महिलांचा अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान

महिलांना सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल: महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

Deepak Chavhan
  • May 31 2023 8:48PM
मुंबई,दि, ३१ :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आज ज्या महिलांना प्राप्त झाला आहे त्यांचे अभिनंदन करून या पुरस्कार प्राप्त महिलांनी यापुढेही सामाजिक क्षेत्रात असेच काम सुरू ठेवून योगदान द्यावे असे मत महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रत्येकी १५ ग्रामपंचायतीं मधील ६० पुरस्कार विजेत्या महिलांचा सन्मान सोहळा पार पडला.या कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते.यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, सामाजिक कार्यकर्ता डॉ. स्मिता काळे बनगर, ठाणे व पालघर जिल्ह्यातील सरपंच,पुरस्कार प्राप्त महिला यावेळी उपस्थित होत्या. 
      
महिला व बालविकास मंत्री.मंगलप्रभात लोढा म्हणाले,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर, समाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतलेला आहे.या पुरस्कारासाठी राज्यातील एकूण २७८९७ ग्रामपंचायतींमध्ये  सुमारे ५५,७९४ महिलांना पुरस्कार देवून आज गौरविण्यात आले आहे.महिला आज सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी पुढे येत आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज दिलेला पुरस्कारामुळे नव्याने सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी महिला तयार होतील अशी मला आशा आहे असेही मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.

               

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार