सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अखेर ९ महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या; अवकाशातून पृथ्वीवर परतीचा थरारक प्रवास कसा होता? जाणून घेऊया

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर भारतीय वेळेनुसार आज (१९ मार्च) पहाटे ३:३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले.

Sudarshan MH
  • Mar 19 2025 9:21AM

Sunita Williams Return: नासा क्रू-9 मोहिमेतील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स, निक हेग, बुच विल्मोर आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोरबुनोव्ह हे स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून यशस्वीरित्या पृथ्वीवर परतले. नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर या सर्व अंतराळवीरांनी पृथ्वीवर पाऊल ठेवले. या सर्व अंतराळवीरांचे कॅप्सूल फ्लोरिडा किनारपट्टीजवळील समुद्रात उतरले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

या पुनरागमनासंदर्भात नासाने एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला. स्पेस स्टेशनवरून परत आलेल्या चारही अंतराळवीरांनी अभिवादनही केलं. यासंदर्भात नासाने चारही अंतराळवीरांचा पृथ्वीवर लँडिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. यात स्पेस स्टेशनवरून परतलेले अंतराळवीर अभिवादन करताना दिसत आहेत. “पृथ्वीवर परतल्यानंतर Crew9 ची पहिली झलक आपल्याला पहायला मिळत आहे! आता रिकव्हरी पथके ड्रॅगनमधून बाहेर येण्यासाठी क्रूची मदत करतील. दीर्घकाळाच्या मोहिमेवरून परतल्यानंतर सर्व क्रू सदस्यांसाठी असलेली ही एक मानक प्रक्रिया आहे,” असे नमूद केलं.

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ५ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. दोघांचाही हा प्रवास केवळ ८ दिवसांचा होता. परंतु अंतराळ स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना ९ महिने तिथे थांबावे लागले. या मोहिमेदरम्यान, सुनीता विल्यम्स वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त राहिल्या.

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) देखभाल आणि स्वच्छतेमध्ये आपली भूमिका बजावली. या स्टेशनला सतत देखभालीची आवश्यकता असते. असे म्हटले जाते की या स्टेशनचे क्षेत्रफळ जवळजवळ फुटबॉल मैदानाइतके आहे. सुनीता विल्यम्स यांनी जुन्या उपकरणांमध्येही बदल केले आणि काही प्रयोग केले. सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल ६२ तास ९ मिनिटे घालवली अर्थात ९ वेळा स्पेसवॉक केले. सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने ९०० तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी १५० हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार