दुसऱ्या धर्माचे पालन करणाऱ्या आदिवासींच्या सवलती रद्द करा- अँड हिम्मत तावडे. तळोदा येथे आदिवासी महासंम्मेलनात मागणी
तळोदा येथे आदिवासी महासंम्मेलनात मागणी
तळोदा- ज्या लोकांनी आपल्या पूर्वजांच्या रुढी, परंपरा, पूजा पध्दती सोडून दिली आहे आणि अन्य धर्माच्या पूजापध्दतीचे आचरण करायला सुरुवात केली आहे,अशा लोकांना आदिवासी संस्कृती मधून लाभ किंवा आदीवासींच्या नावाखाली मिळणाऱ्या सवलती, आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी जनजाती सुरक्षा मंचचे अँड.हिम्मत तावडे तळोदा येथे आयोजित आदिवासी महासंम्मेलनात बोलतांना केली.
तळोदा येथे जनजाती सुरक्ष मंचतर्फे आदिवासी महासंम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यानिमित्त शहरातुन भव्य रॅली काढण्यात आली.सदर रॅली बिरसा मुंडा चौकापासून स्मारक चौक, मेन रोड मार्गे काढण्यात आली.त्यानंतर वामनराव बापुजी मंगल कार्यालय येथे महासंम्मेलन संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमात देवगिरी कल्याण आश्रमाचे संयोजक डॉ.विशाल वळवी,देवल्या महाराज, क्षेत्रीय सहसंघटनमंत्री गणेश गावीत, देवगिरी प्रांताचे सहसचिव विरेंद्र वळवी, देवगिरी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष गिरीश वसावे, श्रीमती रजुबाई पावरा, श्रीमती कल्पना पाडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अँड हिम्मत तावडे म्हणाले की, जनजाती सुरक्षा मंचतर्फे देशभरात आदिवासी संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी, आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी महासंम्मेलन व मोर्चे काढून जनजागृती करण्यात येत आहे. देशात काही ठिकाणी आदिवासी लोकांनी ख्रिश्चन व मुस्लिम, असे धर्मांतरण केले आहे.हे लोक दोन्ही ठिकाणी लाभ घेत आहेत.म्हणजे घरकुलांपासुन ते एमबीबीएसच्या शिक्षणापर्यंत लाभ या लोकांना मिळत आहे.तुम्ही एकाच ठिकाणी लाभ घ्या.इकडे घ्या किंवा तिकडे घ्या.आदिवासी बांधवांना त्यांची संस्कृती टिकवू द्या, असे आवाहन त्या
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प