सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अमृत सरोवर अभियानाची कामे त्वरीत पूर्ण करावीत* *जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या यंत्रणेना सूचना

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या यंत्रणेना सूचना

Nandurbar. MH
  • Jun 22 2022 3:41PM
नंदुरबार, दि.22(जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात सुरु असलेली अमृत सरोवर अभियानाची कामे त्वरीत पूर्ण करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी विविध यंत्रणेला दिल्यात.
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात अमृत सरोवर अभियान संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शाहूराज मोरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे आदी उपस्थित होते.
 
 श्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यात अमृत सरोवर अभियानांतर्गत 91 कामे करण्याबाबत विविध यंत्रणेने माहिती भरली असून त्यापैकी 73 कामे प्रगतीपथावर असल्याने तलाव, शेततळी, नाला खोलीकरणाचे गाळ काढण्याची कामे पाऊस पडण्यापूर्वी पूर्ण करावीत. वन विभागाने नरेगामध्ये अमृत सरोवराची अधिकाधिक कामे घ्यावीत. पूर्ण झालेल्या अमृत सरोवराचे जिओ टँगची छायाचित्रे, अमृत सरोवराचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची माहिती, वेळोवेळी होणाऱ्या कामांचा तपशिल, प्रशिक्षण तसेच सरोवरातून निघालेल्या अतिरिक्त गाळ, माती, मुरुम रस्ते, रेल्वे इतर कामासाठी दिला असल्यास त्याबाबतची माहिती ‘अमृत ॲप’ मध्ये अपलोड करावी. अमृत सरोवराच्या परिसरात वृक्ष लावगड व बांबूची लागवड करण्यात यावी. अशा सूचना त्यांनी दिल्यात.
 
उपजिल्हाधिकारी श्री. मोरे यांनी प्रास्ताविकात सुरु असलेल्या अमृत सरोवराची माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, वने, कृषी,जलसंधारण, विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार