सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*हुमणी अळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन*

प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन

Nandurbar. MH
  • Jun 22 2022 4:09PM


नंदुरबार, दि.22 (जिमाका वृत्तसेवा) : जून महिन्यामध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर हुमणी अळीचे भुंगेरे जेव्हा जमिनीतून बाहेर पडतील त्यावेळी कडूनिंब, बोर, बाभळी यासारख्या झाडाशेजारी प्रकाश सापळे लावून भुंगेरे वेळीच नष्ट केल्यास किडींचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भुंगेरे नष्ट करण्याचे काम मोहीम स्वरुपात राबविण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

 खरीप हंगामात ज्वारी, भात, ऊस इत्यादी पिके तर रब्बी हंगामात गहू, हरभरा इत्यादी पिके घेतली जातात. या पिकांवर हुमणी अळीचा उपद्रव बऱ्याच प्रमाणात वाढ होते. या किडीच्या उपद्रवामुळे सर्वसाधारणपणे ३० ते ८० टक्के नुकसान होते. शाश्वत पाणीपुरवठयाच्या जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये ओलावा आणि पाणीपुरवठा जास्त होत असल्याने हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. 
भुंगेरा व अळी हुमणीच्या अळीच्या दोन अवस्था असून भुंगेरा झाडाची पाने खातात, तर अळ्या पिकांची मुळे खातात. अळी अवस्था पिकास अत्यंत हानीकारक आहे. त्यामुळे पिक वाळून जाते. जास्त प्रदुर्भाव झाल्यास शेतातील संपूर्ण पीक नाश पावते.
वळवाचा पहिला पाऊस चांगला झाल्यास सुप्तावस्थेत असलेले भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, कडुनींब, बोर या झाडांवर गोळा होतात. अगोदर मादी भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात. त्यापाठोपाठ नर भुंगेरे बाहेर पडतात. झाडावर बसून ते पाला खातात. झाडावरच नर-मादीचे मिलन होवून नंतर नर मादी वेगळे होतात आणि पुन्हा झाडाचा पाला खाऊ लागतात. सुर्योदयापूर्वी थोडावेळ अगोदर भुंगेरे परत जमिनीत जावून लपतात. भुंगेरे फक्त रात्रीच्या वेळीच जमिनीतून मिलनासाठी बाहेर पडतात. २ ते ३ दिवसांनी मादी जमिनीत अडी घालण्यास सुरूवात करते. हा नियंत्रणासाठी योग्य कालावधी आहे.

पहिला पाऊस झाल्यावर भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावीत व रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करावा. त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगे यांचा नष्ट होईल.
नैसर्गिकरित्या वातावरणातील भुंगेरे, किडे हे प्रकाशाकडे आकर्षित होतात. यास्तव हुमणीचे भुंगेरे आकर्षित करण्यासाठी पिवळा प्रकाश देणारा बल्ब जमिनीपासून सुमारे ३ फूट ऊंचीवर अडकवून ठेवावा. बल्ब अडकवण्यासाठी शेतातील उपलब्ध लाकडी काठ्यांचे तिकाटणे करावे. बल्बखाली २ बाय २ फूट आकाराचा व फूट खोलीचा खड्डा घ्यावा यामध्ये उपलब्ध प्लॅस्टीक कागद टाकून त्यात अर्धा फूट ऊंचीचे रॉकेल मिश्रीत पाणी भरावे. रात्रीच्या संधी प्रकाशात वातावरणातील भुंगेरे या बल्बकडे आकर्षित होतात. बल्बखाली साठविलेल्या रॉकेल मिश्रीत पाण्यात पडून मरण पावतात. हुमणी नियंत्रणाचा हा साधा, सोपा व कमी खर्चीक आणि अतिशय प्रभावी उपाय आहे.
000

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार