सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शहाद्यात लग्नास नकार दिल्याने महिलेस जीवे मारण्याची धमकी शहादा : - लग्नास नकार दिल्याच्या रागातून रस्त्यात गाडी अडवित अंगावर अ‍ॅसीड फेकण्याचे सांगत शिवीगाळ करून

अ‍ॅसीड फेकण्याचे सांगत शिवीगाळ करून

Sudarshan MH
  • May 3 2023 10:03PM
शहाद्यात लग्नास नकार दिल्याने महिलेस जीवे मारण्याची धमकी
शहादा : - लग्नास नकार दिल्याच्या रागातून रस्त्यात गाडी अडवित अंगावर अ‍ॅसीड फेकण्याचे सांगत शिवीगाळ करून महिलेला जीवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या एकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
याबाबत शहादा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील नितीन नगरात राहणारी एका ३३ वर्षीय महिला ही मित्रासोबत गाडीने (क्र.जीजे २६ एबी ४११४) घरी जात होती. यावेळी लग्नास नकार दिला या कारणातून चेतन मुलचंद तिरमले याने रस्त्यात गाडी अडविली, तसेच हातातील दगडाने गाडीच्या साईका बाजूला मारुन दरवाजाच्या बाजूला टोचा पडला. तसेच बोनटवर बुक्क्याने मारत सदर महिलेला माझ्यासोबत लग्न कर नाही तर जीवेठार मारेन व अ‍ॅसीड टाकेल अशी धमकी दिली. 
 
याबाबत महिलेने शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन मुलचंद तिरमले (रा.नागसेन नगर, शहादा) याच्याविरुद्ध भादंवि कलम ३४१, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास किरण पावरा करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार