सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबारात घरफोेडी ; साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

शहरातील द्वारकाधिश नगरात चोरटयांनी घराचा कडीकोंडा तोडून घरफोडी करीत रोकडसह सोन्याचे दागिने असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

Sudarshan MH
  • May 4 2023 10:28PM



नंदुरबार : शहरातील द्वारकाधिश नगरात चोरटयांनी घराचा कडीकोंडा तोडून घरफोडी करीत रोकडसह सोन्याचे दागिने असा साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. 

याबाबत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील द्वारकाधिश नगरात रहिमोद्दीन अल्लउद्दीन मन्यार यांचे घर आहे. सदर घराचा कडीकोंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. यावेळी घरात असलेली ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड व १ लाख ६३ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण पाच लाख ४३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. 

याबाबत रहिमोद्दीन मन्यार यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५२, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माधुरी कंखरे करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार