सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला शेअर बाजारातील गुंतवणुकीचा कानमंत्र!

संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. विरोधकांना प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की हे लोकं ज्या सरकारी कंपन्यांवर टीका करत आहेत त्यात पैसा गुंतवला तर फायदा होईल.

Shruti Turkane
  • Aug 11 2023 3:05PM

नवी दिल्ली:

      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 ऑगस्ट रोजी संसदेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, की विरोधी पक्षाला ज्याच्याबद्दल वाईट वाटते त्याचे चांगलेच होते. बँकिंग क्षेत्र, एचएएल आणि एलआयसी वरील विरोधकांच्या आरोपांवर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

      बँकिंग क्षेत्राबद्दल बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की देशातील बँकिंग क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. आपला मुद्दा मांडण्यासाठी परदेशातून मोठमोठे विधवांना आणले, देशात अफवा पसरवल्या. आज आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निव्वळ नफा दुपटीने वाढला आहे. एनपीएवर मात करून आम्ही बँकिंग क्षेत्र मजबूत केले. पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा बँकांचे वाईट करण्याची त्यांची इच्छा होती तेव्हा काय झाले, आमच्या सरकारी बँकांचा निव्वळ नफा दुपटीने वाढला आहे. तत्पूर्वी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची संपूर्ण तपशीलवार माहिती दिली.

          हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि भारतीय आयुर्विमा महामंडळावरील (एलआयसी) विरोधकांच्या आरोपांबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधकांच्या आरोपांना न जुमानता HAL देशाची शान म्हणून समोर आली आहे. विरोधकांनी जागतिक स्तरावर एचएएलची प्रतिमा डागाळली, एचएएल बंद होणार असल्याचे सांगितले, कर्मचाऱ्यांना भडकावण्याचे काम केले. संरक्षण हेलिकॉप्टर बनवणारी कंपनी एचएएलबद्दल चांगल्या आणि वाईट गोष्टी सांगितल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज एचएएल सर्वाधिक कमाई करणारी संस्था बनली असून ते यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे. LIC आज शेअर बाजारात चांगली कामगिरी करत आहे.

       पंतप्रधानांनी अविश्वास प्रस्तावावर बोलताना लोकांना शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा फॉर्म्युला सांगितला. ज्या सरकारी कंपन्यांवर विरोधक टीका करतात, अविश्वास दाखवतात त्यात पैसा टाका तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल. ज्या प्रकारे ते देशाला आणि लोकशाहीला शिव्याशाप देत आहेत, त्याच पद्धतीने देश-लोकशाही मजबूत होणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार