पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला असून न्यायालयाने याप्रकरणी काँग्रेस नेत्याला समन्स बजावले आहेत.
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, महापुरूष वीर सावरकर यांच्याविरोधात राहुल गांधी यांनी केलेले विधान प्रथमदर्शनी मानहानीकारक असल्याचे दिसते. या खटल्याच्या पुढील तारखेला राहुल गांधी यांना वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीमार्फत न्यायालयात हजर राहावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.