सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पिंपरी - चिंचवडमध्ये एकाच दिवशी सहा आत्महत्यांच्या घटनांची नोंद!

वाढता ताणतणाव, मानसिक आजारपण याव्यतिरिक्त कर्जबाजारीपणा, कौटुंबिक वाद अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

Sudarshan MH
  • Jan 31 2025 10:40AM

पिंपरी - चिंचवड: पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एकाच दिवशी सहा आत्महत्यांच्या घटनांची नोंद झाली आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास गौरव ज्ञानेश्वर अगम (वय २८) या तरुणाने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या दुसर्‍या घटनेत प्रसाद संजय अवचट (वय ३१, रा. पुनावळे) या तरुणाने दुपारी साडेचारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

आत्महत्येच्या तिसर्‍या घटनेत विकास रामदास मुरगुंड (वय ३५, रा. गणपत लांडगे चाळ, भोसरी) या व्यक्तीने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना २७ जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येच्या चौथ्या घटनेत मनाप्पा सोमल्या चव्हाण (वय ५२, रा. शिंदेवस्ती, नेरे, ता. मुळशी) यांनी घराशेजारील लिंबाच्या झाडाला डोक्याच्या पटक्याने गळफास घेतला. ही घटना २७ जानेवारी रोजी पावणेदहाच्या सुमारास घडली.

नवनाथ भगवान पवार (वय ४६, रा. पवार चाळ, दत्तनगर, थेरगाव) यांनी राहत्या घराच्या शयनगृहात बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना सोमवारी (दि. २७) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास उघडकीस आली. मात्र, मृत्यूचे नेमके कारण समजू न शकल्याने त्यांचा व्हिसेरा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. आत्महत्येच्या सहाव्या घटनेत सुवर्णा श्रीराम पवार (वय ३६, रा. समीरा हाईटस्, ढोरेनगर, जुनी सांगवी) या महिलेने राहत्या घरव्त छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २७) रात्री बाराच्या सुमारास उघडकीस आली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

दिवसेंदिवस वेगवेगळ्या कारणांमुळे वाढणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त होत चालले आहे. वाढता ताणतणाव, मानसिक आजारपण याव्यतिरिक्त कर्जबाजारीपणा, कौटुंबिक वाद अशा वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सगळीकडे याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार