पुणे: मागच्या आठवड्यात पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाला होता. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांत तक्रार येताच गुन्हा दाखल करत पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर होती. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. पुणे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अटक केली आहे. कोर्टाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र आता या आरोपीबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोठडीत असलेला आरोपी दत्तात्रय गडेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. त्यामध्ये अनेक बाबी समोर येत आहेत. चौकशीतून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून बस स्थानकाच्या परिसरात वावरत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
आरोपीने पोलिसांचा गणवेश परिधान केल्याचा फोटो पोलिसांना मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. आरोपीच्या मोबाईलचे विश्लेषण पोलिसांनी केले आहे. पुण्यातील शिवाजीनगर , स्वारगेट, शिरूर, अहिल्यानगर, सोलापूर बसस्थानकात वावर असल्याचे समोर आले आहे. तसेच आशा प्रकारचे आणखी काही गुन्हे गाडेने केले असल्याचा संशय पोलिसांना आहे.
पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. अखेर पुणे पोलिसांनी या नराधमला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान पुणे कोर्टाने आरोपी दत्ता गाडेला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.