सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आता खुलताबाद नव्हे 'रत्नापूर'; औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबाद आणि दौलताबाद गावांचे नामांतर होणार - मंत्री संजय शिरसाट

औरंगजेबाची कबर हटवावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटले असून खुलताबादच्या नामांतरासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारकडे खुलताबादच्या नामांतराची मागणी केली आहे.

Sudarshan MH
  • Apr 7 2025 10:04AM

छत्रपती संभाजीनगर: औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दंगल झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याने कबरीला संरक्षण असल्याने ती हटवता येणार नसल्याचे सांगितले. तसेच कबरीचे उदात्तीकरण होऊ देणार नसल्याचेही ठणकावले. आता ज्या खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे त्या खुलताबादचे नाव बदलू, अशी घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. केवळ भाजप, शिवसेना नव्हे तर स्थानिक जनता यासाठी आग्रही आहे. 

औरंगजेबाची कबर असलेले खुलताबादचे नाव रत्नापूर होते. औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद केले. देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले. खुलताबादचे नामांतर होणार असून दौलताबादचेदेखील नामांतर होणार आहे. संभाजीनगरचे नाव खडकी होते. कालांतराने त्याचे नाव औरंगाबाद झाले. तसे खुलताबादचे नाव रत्नापूर होते. कालांतराने ते खुलताबाद झाले. औरंगजेबाने त्याच्या काळात जे काही कारनामे केले आहेत त्यामुळे अनेक शहरांची नावे बदलली. धाराशिवचे नाव बदलले गेले. नगरचे नाव बदलले गेले. हे सगळे ‘बाद’ ‘बाद’ आहे ना त्यांची नावे बदलण्याची प्रोसेस आम्ही करत आहोत, असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

संजय शिरसाट म्हणाले, की औरंगजेबाची कबर आहे तेथे मराठ्यांचे शौर्याचे प्रतीक असलेले छत्रपती संभाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महारांजे स्मारक उभारण्यासाठी निवेदने येत आहेत. शिवाजी महाराजांचे आणि संभाजी महाराजांचे स्मारक या ठिकाणी बांधण्यात येईल. औरंगजेबाने नामांतर केलेल्या सगळ्या गावांची नावे बदलणार आहोत, असा निर्धार देखील शिरसाट यांनी बोलून दाखवला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार