सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जनसेवा हाच देव मानणारे संत गाडगेबाबा

स्वच्छतेचे पुजारी व लोकसंत म्हणून विदर्भातील संत गाडगेबाबा यांना ओळखले जाते.

निलेशकुमार इंगोले ९३७११४५१९५,
  • Feb 23 2021 10:14PM

स्वच्छतेचे पुजारी व लोकसंत म्हणून विदर्भातील संत गाडगेबाबा यांना ओळखले जाते. त्यांच्या विचारातून व कार्यातून फार मोठे सामाजिक प्रबोधन घडून आले. संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ मध्ये अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. गाडगेबाबांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, समाजातील लोकांचे अज्ञान दूर करणे, सामाजिक सुधारणा, शिक्षणावर भर, स्वच्छतेचे महत्त्व यासाठी आयुष्यभर कार्य केले. संत गाडगेबाबा हे गोरगरीब, दीनदलित, पीडित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाज सुधारक होते.

त्यांनी आपल्या किर्तनातून समाज प्रबोधनाचे माध्यम म्हणून जनसामान्यांमध्ये जागृती करण्याचे कार्य केले. परंपरेप्रमाणे कीर्तनकार आपल्या कीर्तनातून "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" यावर भर देतात. परंतु गाडगेबाबांनी जनतेला आधी प्रपंच काटेकोरपणे करून मगच परमार्थ साधावा अशी वास्तववादी शिकवण दिली.

बाबांनी प्रत्यक्ष कृती केली व लोकांच्या दैनंदिन समस्यावर मारा करून त्या मिटवण्यासाठी आपल्या कीर्तनातून प्रबोधन केले. गाडगेबाबांना देवळातील देव ही संकल्पना मान्य नव्हती. देव देवळात नसून तो जनताजनार्दनाच्या रूपाने तुमच्यासमोर उभा आहे. दीनदुबळ्यांची सेवा करा, त्यांच्या रूपाने देव उभा आहे असा उपदेश त्यांनी केला. ते स्वतः कधीही देवळात गेले नाहीत. माळा, टीळे असा पसारा त्यांनी कधी वाढवला नाही. उलट त्यांनी दांभिक ब्रह्मचर्याचा निषेध केला. ज्यांना लोकसेवेची, कष्टाची कामगिरी आवडत असेल त्यांनी ती कडकडीत निर्मोही वृत्तीने करावी, पण हे करतांना आधी प्रपंच नीटनेटका करावा. मग परमार्थ साधावा असे ते सांगत.

आपल्या आयुष्यात बाबांनी बेघरांना सहारा दिला. कधीही कोणत्याही प्रकारचा विटाळ न पाडता स्वतः अनेक गरजूंना मदतीचा हात दिला. हे करीत असतांना त्यांनी आयुष्यभर मानवसेवेत स्वतःला झोकून दिले. अनेक बेघरांसाठी अन्नछत्रे, धर्मशाळांची सोय केली. लोकांची मदत मिळूवुन आयुष्यभर आपल्या साध्या राहणीने व प्रगल्भ विचारसरणीने समाजाला माणुसकीचा व मानवतेचा संदेश दिला.

मानवाच्या मनात माणसाविषयी प्रेमाची आदराची भावना निर्माण झाली तर या धरतीलाच स्वर्गच बनवता येईल असे त्यांचे विचार होते. त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली. अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली. कुष्ठरोग्यांची सेवा केली. अशाप्रकारे मानवातच देव शोधून त्यांची सेवा बाबांनी आयुष्यभर केली. या जनसेवेच्या धकाधकीच्या प्रवासातच अमरावती येथे २० डिसेंबर १९५६ रोजी बाबांचे देहावसान झाले. सर्व मानवजातीला मानवधर्माची शिकवण देणाऱ्या या महान संताला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार