शिर्डी: आज शिर्डीमध्ये भाजपाचे महाविजयी शिर्डीत झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी सध्याच्या परिस्थितीतील आव्हानांवर उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला. बांगलादेशी घुसखोर आणि फसवणूक थांबवण्याची गरज
फडणवीस म्हणाले, "अलीकडे राज्यात बांगलादेशी घुसखोर आढळत आहेत. हे घुसखोर बनावट कागदपत्रे तयार करत आहेत. अशा घुसखोरांना ओळखून त्यांना राज्याबाहेर काढण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे."
जातीय विद्वेष पसरवणाऱ्या अराजकवादी शक्तींविरोधात संघर्ष
फडणवीस म्हणाले, की अराजकवादी शक्ती महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक आहे तो सेफ आहे' हा नारा दिला आहे. त्यामुळे समाजामध्ये कोणतीही फूट पडू न देता आपण सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचे आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.