भारतातील दिग्गज टेलिकॉम कंपनी एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना 4G मोबाइल हँडसेट खरेदी करण्यासाठी कर्ज देणारी एक योजना आणली आहे. याकरता एअरटेलने IDFC बँकेशी हातमिळवणी केली आहे. एअरटेल 2G मोबाइल सर्व्हिसेसचा वापर करणारे सब्सक्रायबर्स त्यांच्या आवडीचा 4G स्मार्टफोन एअरटेलद्वारे दिलेल्या कर्जातून खरेदी करू शकतात. याकरता त्यांना डाऊन पेमेंट करावे लागेल आणि एका खास टेरिफ प्लॅनसह हा हँडसेट मिळेल.
या कर्जाच्या ऑफरसाठी एअरटेलने आयडीएफसी बँकेबरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारी अंतर्गत ज्यांना 4G आणि 5G मोबाइल हँडसेटची आवश्यकता आहे अशा पात्र असणाऱ्या 2G ग्राहकांना कर्ज देण्यात येईल. अशाच ग्राहकांना कर्ज दिले जाईल जे कमीतकमी 60 दिवसांसाठी एअरटेलच्या नेटवर्कवर सक्रिय असतील. याअंतर्गत, ग्राहकांना 6800 रुपये किंमतीचा 4G स्मार्टफोन कर्जावर घेण्यासाठी 3259 रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल आणि 603 रुपये प्रति महिना ईएमआय घ्यावा लागेल. कर्जाचा कालावधी 10 महिने असेल आणि त्यानुसार ग्राहकांना एकूण 9,289 रुपये द्यावे लागतील. तसंच ही ऑफर 28 दिवसांच्या बंडल पॅकसह येईल.
या पॅकमध्ये 249 रुपयांमध्ये 1.5 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येईल. यामध्ये एकूण किंमत 330 दिवसांसाठी 2,935 रुपये होईल. डिव्हाइसच्या वास्तविक किंमतीसह, शेवटी ग्राहकाचे एकूण 9,735 रुपये खर्च होतील. एअरटेलकडून 60 दिवसांसाठी ही ऑफर आहे
एअरटेलने या ऑफरचे नाव झिरो एक्स्ट्रा कॉस्ट असे दिले आहे. कारण याअंतर्गत ग्राहकांकडून घेतली जाणारी किंमत मार्केटमधील मुळ किंमतीपेक्षा कमी असेल. जर मार्केटमध्ये एवढ्या महिन्यांच्या टेरिफ प्लॅनसह स्मार्टफोन खरेदी केला तर त्यांची किंमत जास्त होते.