सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय संस्कृतीचा अक्षय्यवृक्ष आहे; पंतप्रधान मोदींचे नागपुरात गौरवोद्गार

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका महान वटवृक्षाप्रमाणे जगासमोर उभा आहे. हा केवळ एक सामान्य वृक्ष नसून, भारताच्या अमर संस्कृतीचा अक्षयवट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Sudarshan MH
  • Mar 31 2025 11:16AM

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रविवारी दि. ३० मार्च रोजी दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायभरणी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला. जिथे सेवा आहे, तिथे स्वयंसेवक आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी गौरवोद्गार काढले. स्वयंसेवकांना सेवा, संस्कार आणि साधना या मूल्यांमुळेच प्रेरणा मिळते, असेही मोदींनी म्हटले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रवासाबद्दल आणि १०० वर्षाचाही उल्लेख केला. नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या रूपात एका तीर्थक्षेत्राची स्थापना होत आहे. माधव नेत्रालयाने अनेक दशकांपासून लाखो लोकांची सेवा केली आहे. आता नवीन परिसरामुळे या सेवाकार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

आपल्या संतांनी भक्तीच्या विचारांनी आपली राष्ट्रीय चेतनेला नवीन ऊर्जा दिली. गुरुनानक, कबीर, तुलसीदास, सूरदास, तुकाराम, एकनाथ, नामदेव, ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी आपल्या राष्ट्रीय चेतनेला मौलिक विचारांनी प्राण ओतले. या आंदोलनाने भेदभावाचे जाळे तोडले. समाजाला एकतेच्या सूत्रात जोडले. स्वामी विवेकानंदांनी निराशात असलेल्या समाजाला जागं केलं. त्यांना त्यांच्या स्वरुपाची आठवण करून दिली. त्यांच्यातील आत्मसन्मान जागवलं. त्यांनी राष्ट्रीय चेतना विझू दिली नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार