रत्नागिरी: एका बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी मुंबई येथे एका गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर तो रत्नागिरीतील असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ग्रामपंचायतीने खोटा दाखला दिल्याचे लक्षात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी शिरगाव ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचाला चौकशीसाठी मुंबईला बोल्यावल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी एका गुन्ह्यातील बांगलादेशी नागरिकाला परकीय नागरिक अधिनियम 1946 या गुन्ह्यात आरोपी मोहम्मद इद्रीस मोहम्मद इशाक शेख उर्फ नसीम (42 वर्षे नाव जोशीमुद्दीन बिशू देवान हा मूळ बांगलादेशी) नागरिक याला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक केली होती.
शिरगांव ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, जन्मप्रमाणपत्र दिनांक 04/03/2020 रोजी बाळाचे नाव मोहम्मद ईद्रीस शेख (जन्म दिनांक 01/05/1983), जन्म ठिकाण (उद्यमनगर पडवेकर कॉलनी ता. जि. रत्नागिरी,), आई वडिलांचा कायमचा पत्ता ( उद्यमनगर पडवेकर कॉलनी ता. जि. रत्नागिरी) आईच नाव – शाहिदा बेगम मोहम्मद इसाक शेख, वडील मोहम्मद इसाक शेख असा खोटा जन्म दाखला 04/03/2020 रोजी बनवून देण्यास सहकार्य केल्याने शिरगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच, ग्रामपंचायत ग्रामसेवक व ज्यांनी शिफारस दिली. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी बोलावले आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.